मुंबई विमानतळावर 'विश्वविजेत्या' युवा सेनेचे शाही स्वागत, स्वागताला चाहत्यांची अलोट गर्दी

मुंबई   : हरारेच्या मैदानावर तिरंगा फडकवून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणारा भारताचा युवा संघ आज मायदेशात दाखल झाला. दुपारी मुंबई विमानतळावर विमानाने लँडिंग करताच खेळाडूंचे जंगी आणि शाही स्वागत करण्यात आले. हरारेमध्ये इंग्लंडला १०० धावांनी धूळ चारून विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान करणाऱ्या या 'यंग ब्रिगेड'ला पाहण्यासाठी मुंबईकरांनी विमानतळाबाहेर एकच गर्दी केली होती.


कर्णधार आयुष म्हात्रे आणि फलंदाजीतील नवा तारा वैभव सूर्यवंशी विमानतळाबाहेर येताच 'इंडिया-इंडिया'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात खेळाडूंचे स्वागत झाले. चाहत्यांचे हे अफाट प्रेम पाहून कर्णधार आयुष म्हात्रे भारावून गेला होता. खेळाडूंनी चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत आणि सेल्फी देत आपला मार्ग काढला. कुटुंबियांच्या भेटीने खेळाडूंचे डोळेही पाणावले होते. यावेळी कर्णधार आयुष म्हात्रे याच्या वडिलांनी, योगेश कमलाकर म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आयुषने विश्वचषक जिंकून आणला आणि संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या मुलाच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०२८ आणि २०२२ या वर्षी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता झिम्बाब्बे आणि नामिबिया येथे झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारतीय संघाने जिंकला. भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. तसेच या सामन्यात अंतिम सामन्यात भारताने ५० षटकात विक्रमी ९ बाद ४११ धावा उभारल्या होत्या. यामध्ये एकट्या वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या होत्या. आयुष म्हात्रेने ५३ धावांची खेळी केली होती. याशिवाय संघातील इतर खेळाडूंनीही चांगले योगदान दिले होते. त्यानंतर ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३११ धावांवरच सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजीत आरएस आंब्रिश, दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी मोलाचे योगदान दिले होते.

Comments
Add Comment

श्रेयस अय्यरचा महाविक्रम! विंडीजविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकत मोडले रोहित अन् विराटचे रेकॉर्ड्स

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर झंझावात पाहायला मिळाला. 

वेस्ट इंडिजला पहिल्या टी20 सामन्यात भारताने लोळवलं, 171 धावांचं आव्हान सहज गाठलं

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौच्या इकाना

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ जाहीर, 4 वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पुरुष निवड समितीने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि इंडिया 'ए'

Smriti Mandhana: मोठी बातमी! स्मृती मंधाना महिला संघाची कर्णधार

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाची

IND vs WI 1st T20I: पहिल्या टी20 सामन्यातून वैभव सूर्यवंशी बाहेर, झालं असं की...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने भारतीय प्लेइंग 11 घोषणा केली. या

IND vs WI, 1st T20: नाणेफेक टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार अय्यरने घेतला असा निर्णय; प्लेइंग 11 बाबत जाणून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टी20 सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि