IND vs WI 1st T20I: पहिल्या टी20 सामन्यातून वैभव सूर्यवंशी बाहेर, झालं असं की...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून वैभव सूर्यवंशीला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. असा निर्णय का घेतला? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने भारतीय प्लेइंग 11 घोषणा केली. या घोषणेनंतर क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं. कारण या संघात वैभव सूर्यवंशीचं नाव नव्हतं. एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत वैभव सूर्यवंशी संघाचा भाग होता. एशियन गेम्स स्पर्धेत भारताच्या दोन्ही सामन्यांमध्ये वैभवने डावाची सुरुवात केली होती. श्रीलंकेविरुद्ध 38 आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात 15 धावा केल्या होत्या. त्याच्या स्फोटक फलंदाजीने आणि कठीण खेळपट्ट्यांवरील आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्याला पहिल्या टी20 सामन्यातून डावलल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. वैभव सूर्यवंशीला मायदेशात पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. लखनौमधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरने पंजाबच्या नमन धीर पदार्पणाची संधी दिली. अर्शदीप सिंग आणि मयंक यादवलाही प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. एशियन गेम्समध्ये वैभव सूर्यवंशी संघाचा भाग होता. त्यामुळे त्याला अचानक वगळणं हा चर्चेचा विषय ठरणारच.. पण त्याला कारणही तसंच आहे. वैभव सूर्यवंशीला बाहेर करण्याचं मुख्य कारण म्हणजे टीम कॉम्बिनेशन...

वैभव सूर्यवंशीचं काय झालं?


जापानमध्ये पार पडलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने एक अतिरिक्त फलंदाज आणि फिरकी अष्टपैलू यांना मैदानात उतरवलं होतं. कारण तिथली खेळपट्टी फिरकीला मदत करणारी होती. पण लखनौमध्ये या विपरीत स्थिती आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सामन्यात अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन ओपनिंग करणार आहे. दुसरीकडे, नमन धीरला संधी देण्याचं कारण म्हणजे फलंदाजीसोबत तो चांगली फिरकी गोलंदाजीही करतो. पण नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत त्याला आपल्या फिरकीचा प्रभाव पाडता आला नाही.






अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन पुन्हा एकदा भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करतील. इशान किशन, कर्णधार अय्यर आणि तिलक वर्मा मधल्या फळीत खेळतील. खालच्या फळीत शिवम दुबे आणि नमन धीर यांच्यावर कठीण परिस्थितीत संघासाठी धावा करण्याची जबाबदारी असेल.

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव
Comments
Add Comment

Rising Stars Asia Cup: वनडे फॉरमेटच्या पहिल्याच परीक्षेत अभिषेक शर्मा नापास; अवघ्या 13 चेंडूंतच डाव आटोपला!

अभिषेक शर्मा टी20 फॉरमेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे त्याने आपल्या फलंदाजीने सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 8 गडी राखून नमवलं, WTC गुणतालिकेत झाला असा बदल

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका पाकिस्तानने 1-0 ने जिंकली. पहिला

Asia Cup Rising Stars 2026 : नाणेफेक नेपाळने जिंकली आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, कर्णधार तिलक वर्मा म्हणाला...

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून

IND vs NZ 1st Test: केएल राहुल-यशस्वी जयस्वालचं न्यूझीलंडला जोरदार प्रत्युत्तर, 10 वर्षानंतर न्यूझीलंडने पाहिला असा दिवस

[caption id="attachment_1077112" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे.

IND vs NZ 1st Test: दुसऱ्या दिवसावर टीम इंडियाची पकड, दिवसअखेर 1 गडी बाद 159 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 6 गडी गमवून 243

भारताने न्यूझीलंडला 3-2 ने पराभवाची धूळ चारली, शताब्दी हॉकी मालिकेत टीम इंडियाची विजयी सलामी

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील ऐतिहासिक क्रीडा संबंधांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने