Smriti Mandhana: मोठी बातमी! स्मृती मंधाना महिला संघाची कर्णधार

हरमनप्रीतने कर्णधारपद सोडल्यानंतर महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार कोण याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु होती, अखेर याचं उत्तर भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना मिळालं आहे. स्मृती मानधना टीम इंडियाची नवी कर्णधार असणार आहे.

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने, भारतीय महिला संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता तिच्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाला नवीन कर्णधार मिळाली आहे. आतापासून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंधाना झाली आहे.



महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार कोण याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु होती, अखेर याचं उत्तर भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना मिळालं आहे. स्मृती गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटमधील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तिची भारतीय महिला संघाच्या सर्व फॉरमॅटमधील प्रगती पाहता तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून, तिने देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्येही आपले नेतृत्वगुण दाखवले आहेत आणि अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला 2024 आणि 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे.





2013 पासून भारतीय संघाचा भाग असलेल्या स्मृतीला भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. संघ एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असून, गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रगतीवर पुढे वाटचाल करत असताना, आता स्मृती संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारेल. जरी ती आतापासून पूर्णवेळ व्हाईट- बॉल कर्णधार असली तरी, स्मृतीने आतापर्यंत 18 T-20 आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.



स्मृती मंधाना म्हणाली की, "भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणे हा एक अत्यंत विशेष सन्मान आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाची गोष्ट राहिली आहे आणि आता संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची बाब आहे. बीसीसीआय, निवड समिती, माझे सहकारी खेळाडू आणि माझ्या प्रवासात मला साथ देणाऱ्या तसेच माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रत्येकाची मी आभारी आहे.


 


मंधाना पुढे म्हणाली की "हरमनप्रीत आणि तिने गेल्या काही वर्षांत कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाचीही मी दखल घेऊ इच्छिते. तिने अत्यंत निष्ठेने संघाचे नेतृत्व केले आहे आणि ती आमच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे.या भूमिकेसोबत येणारी जबाबदारी मला समजते. संघासोबत काम करण्यास, त्यातून शिकण्यास आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी माझे सर्वोत्तम योगदान देण्यास मी उत्सुक आहे."

Comments
Add Comment

Guinness World Records: ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा’ने रचला इतिहास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’सर्टिफिकेट प्रदान

मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल

NMIA Bus Service: आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळासाठी ST बससेवेची सुरूवात, कशी असेल सुविधा?

मुंबई: नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतून नवी मुंबई

Mumbai Local Megablock: कसारा- आसनगाव मार्गिकेवर पुन्हा विशेष ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

ठाणे: मध्य रेल्वेवरील आसनगाव- कसारा मार्गावर तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणासाठी विशेष ट्रॉफिक आणि

Missing Link accident : मिसिंग लिंकवर अपघातांची मालिका; केळींचा टेम्पो पलटी, बस-ट्रक धडकेत 6 ते 7 जण जखमी

खोपोली : मिसिंग लिंकवर आज पहाटेपासून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री सुमारे 3

Vande Bharat Sleeper : मुंबई-बंगळूरु प्रवास होणार जलद; वंदे भारत स्लीपरची रेक मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई : मुंबई आणि बंगळूरु दरम्यान जलद रेल्वे सेवेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली

Mumbai Pollution : जनरेटरमुळे वाढणारे प्रदुषणही कमी करणार

पंपिंग स्टेशनच्या जनरेटरवर प्रदुषण नियंत्रण प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सखल भागांमधील