Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली; खोकल्याचा त्रास, अस्वस्थता; बारामतीहून पुण्याकडे शरद पवारांचा ताफा रुबी हॉल क्लिनिकमध्ये रवाना

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. खोकल्याचा तीव्र त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना अस्वस्थ वाटत होते. खोकल्याचा त्रास सुरू होता. आज बारामतीमध्ये असतानाच त्यांची तब्येत अधिक बिघडल्याचे जाणवताच वैद्यकीय सल्ला घेण्यात आला. त्यानंतर कोणताही धोका न पत्करता त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुढील तपासणीसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या शरद पवार यांचा ताफा वरवंड परिसराच्या जवळ असल्याची माहिती असून, पुढील पाऊण तासात ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने विशेष वैद्यकीय पथक तैनात ठेवले असून आवश्यक त्या सर्व तयारी करण्यात आल्या आहेत.


शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील असल्याचे समजते आहे. पवार रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच रुबी हॉल क्लिनिक परिसरात कार्यकर्ते आणि समर्थक जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती डॉक्टरांच्या सखोल तपासणीनंतरच समोर येणार असून, त्यांच्या तब्येतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी