ZP Election Result 2026: वळसे पाटील, तानाजी सावंत, भरत गोगावलेंनी गड राखले

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी आपला दबदबा कायम ठेवत विजय मिळवला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, तानाजी सावंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या कुटुंबीयांनी गड राखत राजकीय वारसा पुढे नेला, तर काही ठिकाणी मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचेही चित्र पाहायला मिळाले.


आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून २ हजार १३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यातील दोन्ही पंचायत समिती सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून आल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे.


सोलापूर जिल्ह्यातील हाय-व्होल्टेज लढतींमध्येही प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी बाजी मारली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर ६ हजार ८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. याच जिल्ह्यात भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी दहिगाव गटातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी प्रवेश केला आहे.


दुसरीकडे, रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.



परभणीत घराणेशाही नाकारली:


दरम्यान, परभणी जिल्ह्यात मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र समोर आले आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांच्या कुटुंबातील पाच उमेदवारांपैकी केवळ एकालाच विजय मिळवता आला आहे. वरपुडकर यांचा मुलगा, मुलगी, सून आणि एक पुतणा या चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, या निकालाने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण