T20 World Cup 2026 NED vs NAM: नेदरलॅंड्सच्या विजयी खेळीचा पाकिस्तानला फटका

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी रोजी या स्पर्धेतील दहावा सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलॅंड्स विरुद्ध नामिबिया या दोन संघांमध्ये सामना रंगला. यावेळी नेदरलॅंड्सने ७ विकेट्सने नामिबिया संघावर विजय मिळवला. तर बास दी लीडे ‘प्लेयर ऑफ दी मॅच’ चा मानकरी ठरला.


हा सामना जिंकताच नेदरलॅंड्स ग्रुप ए च्या अंकतालिकेत दुसऱ्या स्थानी आला आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सचे गुण सारखे असले तरी नेदरलॅंड्सचा नेट रनरेट पाकिस्तानच्या नेट रनरेटपेक्षा उत्तम आहे. आपला रननेट उत्तम करण्यासाठी आता पाकिस्तानला यूएसए सोबत होणाऱ्या सामन्यात जिंकणं गरजेचं आहे.





असा रंगला सामना :


या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेकीत नेदरलॅंड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नामिबियाची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांनी १० धावसंख्येवरच पहिली विकेट गमावली. दुसऱ्या विकेटसाठी लोफ्टी इटॉन आणि जॅन फ्रायलिंकने ५० धावांची भागीदारी केली.


लोफ्टी ४२ धावा करत बाद झाला. त्यानंतर एकही मोठी भागीदारी झाली नाही. त्यामुळे नामिबियाचा डाव २० षटकात ८ बाद १५६ धावसंख्येवरच संपला. या डावात नेदरलॅंड्सच्या ८ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यामध्ये लोगन वॅन बीक आणि लीडे यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये लीडेने ३ षटकात २० धावा देत २ विकेट्स, तर लोगनने ३ षटकात १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या.


लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलॅंड्सची पहिली विकेट १६ धावांवर, तर दुसरी ४६ धावांवर पडली. त्यानंतर मात्र कोलिन ऍकरमन आणि लीडे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाचा विजय सोपा केला. कोलिन ३२ धावा करत बाद झाला. त्यानंतर लीडेने एडवर्ड्सच्या साथीने चौकार-षटकार मारले. दोघांनी २४ चेंडूत ४३धावांची भागीदारी केली.


यामध्ये एडवर्ड्स ९ चेंडूत एक चौकार-षटकार मारत १८ धावांवर नाबाद राहिला. तसेच लीडे ४८ चेंडूत ७२ धावा करत नाबाद राहिला. त्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. नेदलॅंड्सने १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.


आता नेदरलॅंड्सचा पुढील सामना यूएसएविरुद्ध १३ फेब्रुवारीला आणि नामिबियाचा सामना १२ फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणार आहे.

Comments
Add Comment

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या