आई भवानी यांच्या हातून महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी काही तरी कृतीशील घडो ! आशिष शेलार यांचे वक्तव्य

मुंबई : राज ठाकरे यांच्या पोस्टची दखल घ्यावी असे विशेष त्यात काही नाही. पण काही तरी घडत असताना.. आपल्या स्वभावाप्रमाणे स्वतःची दखल घेतली जावी, मी कसा यात नाही? आणि म्हणूनच तर ही पोस्ट लिहिली गेली नाही ना? असे वाटावे अशीच ती पोस्ट आहे. असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र स्वीकारण्याकरता आणि युनेस्को मुख्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे उभारण्यात आलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी फ्रान्सला जाताना तसेच बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा घेऊन जात असताना, माझ्या लक्षात आले की, मराठी भाषा, महाराष्ट्रातील कला लोककला, लोक परंपरा, समृद्ध बोली भाषा, लोकसंस्कृती, लोकदैवते, महाराष्ट्राची आद्य व वंदनीय प्रतीके, जाज्वल्य इतिहास आणि अखंड परंपरा.... यांच्यासाठी काही करुन दाखवले का? की फक्त
पोस्ट लिहून प्रसिद्धी मिळवणारे ही महाराष्ट्रातील नेते आणि पक्ष आहेत, याची जाणीव काही संवेदनशील मनांना करुन द्यावी म्हणून आज थोडे लिहूनच टाकावे असे ठरवले म्हणून हा अक्षरप्रपंच.


आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या वर्षात देशभरात चालणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबईतल्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवतजी यांचे निमंत्रितांच्या नियोजित कार्यक्रमात व्याख्यान झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे नेमके काय काम करतोय, आमच्यासमोर उद्दिष्टे काय आहेत, देशाची आजची आवश्यकता काय आहे, देशाची मार्गक्रमणा कशी झाली पाहिजे, या विषयावरच्या व्याख्यानमालेचा होता.


म्हणूनच सुरुवातीला हे स्पष्ट करावं लागेल की, मोहन भागवतजी यांनी ठळकपणे मांडले की, मातृभाषेतच शिक्षण दिले गेले पाहिजे, घरातदेखील मातृभाषेतच बोललं गेलं पाहिजे.


आता राज ठाकरे तुम्ही खरेच मराठी भाषेचे प्रेमी असता तर तुम्ही या विषयावर संघाच्या या भूमिकेचे कौतुकच करायला हवे होते. पण.एवढा मनाचा मोठे पणा कुठून आणणार ? हाही प्रश्न आहे. खरं तर आज जगातील सर्वात मोठी तसेच शंभर वर्षे पूर्ण करणारी, देशसेवा करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना महाराष्ट्राच्या मराठी मातीत

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर