Pune: भाजपाने पुण्यात उचललं कठोर पाऊल; ६९ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित, 'या' मोठ्या नेत्यांचा समावेश

पुणे : नुकत्याच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक घडामोडी घडल्याचे दिसून आले. अनेक उमेदवारांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल केला. आता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांववर भाजपाने कारवाई केली आहे. पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.


भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांना पक्षातून सहा वर्षांसाठी दूर ठेवण्यात येणार असून, या कालावधीत त्यांना कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम संदेश पक्षाने दिला आहे. भविष्यातही कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी सूचना शहराध्यक्षांनी केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक शिस्त अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.


याबाबतचे पत्र देखील समोर आले असून पत्रात सर्व ६९ जणांची नावे असून त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सही आहे. या पत्रामध्ये लिहलंय की, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री, रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षाकरिता पार्टीमधून निलंबन करण्यात आले आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या आहेत.
सदरील कार्यवाही ही तात्काळ लागू करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.



भाजपमधून हकालपट्टी केलेल्या ६९ जणांची नावे


1. श्री धनंजय जाधव
2. श्री चंद्रकांत पाटे
3. सौ कादंबरी साळवी
4. श्री जितेंद्र टकले
5. श्री किशोर तरवडे
6. श्री अमोल बालवडकर
7. श्री सोमनाथ गुंड
8. सौ मानसी सोमनाथ गुंड
9. सौ अनिता तळाठी
10. सौ पल्लवी गाडगीळ
11. श्री दत्ता भगत
12. श्री विनोद मोहिते
13. श्री रमेश भंडारी
14. श्री समाधान शिंदे
15. श्री मधुकर मुसळे
16. श्री प्रकाश डोरे
17. श्री बाळासाहेब सानवडे
18. सौ मंजू वाघमारे
19. सौ प्रीती वालकर
20. श्री संदीप लोणकर
21. सौ स्मिता गायकवाड
22. श्री संतोष शिंदे
23. श्री युवराज कुञ्जेकर
24. श्री इफ्तियाज मोमीन
25. श्री अप्पणा दादावाडकर
26. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर
27. अभिजीत उपाध्ये
28. सौ छाया गवळी
29. श्री नवल कुसाळ
30. श्री समीर पठाण
31. श्री प्रणव मोरे
32. श्री योगेश सूर्यवंशी
33. सौ अर्चना योगेश सूर्यवंशी
34. सौ नलिनी मोरे
35. सौ संगिता ठोसर
36. श्री अनिल मेमाणे
37. श्री नितीन मारकड
38. श्री सतीश मारकड
39. सौ वर्षा मारकड
40. श्री रुपेश धुले
41. श्री बापू पोकळे
42. श्री किरण वाळुंज
43. श्री अमोल रायकर
44. श्री संदीप पोकळे
45. मोहिनी देवकर
46. रितेश रासकर
47. सचिन दशरथ दांगट
48. सुरेंद्र कांबळे
49. श्री संदीप जन्हाड
50. सौ सुनीता गलांडे
51. श्री किशोर वाघमारे
52. श्री विजय चौगुले
53. श्री अकबर पठाण
54. श्री राजू साखरे
55. सौ ऐश्वर्या जाधव
56. श्री जितेंद्र जगताप
57. श्री प्रविण खेडकर
58. सौ स्मिता खेडकर
59. सौ उज्वला गोडे
60. श्री बाळासाहेब घोडके
61. श्री सुरेश धनगर
62. सौ स्वाती धनगर
63. सौ सुवर्णा भरेकर
64. सौ पल्लवी केदारी
65. श्री राहुल रामे
66. श्री हरीष परदेशी
67. श्री बंडू जाधव
68. सौ नीता थोरवे
69. श्री प्रीतम नागापुरे

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला