वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू आणि मॅचविनर खेळाडू वानिंदू हसरंगा हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने त्याच्या जागी अष्टपैलू दुशान हेमनथा याच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आयर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात गोलंदाजी करताना हसरंगाच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले होते. प्रचंड वेदना होत असूनही त्याने मैदान सोडले नाही आणि ४ षटकांत २५ धावा देत ३ महत्त्वाचे बळी टिपले. मात्र, सोमवारी झालेल्या एमआरआय रिपोर्टमध्ये त्याच्या स्नायूंना गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्याला किमान ४ ते ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. हसरंगाची उणीव भरून काढण्यासाठी ३१ वर्षीय लेग-स्पिनर दुशान हेमनथा याला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. हेमनथाने आतापर्यंत ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. घरगुती क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ही मोठी संधी मिळाली आहे. केवळ श्रीलंकाच नव्हे, तर न्यूझीलंड संघालाही दुखापतीचा फटका बसला आहे. किवी संघाचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. तसेच हसरंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंका गुरुवारी ओमान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हसरंगा हा केवळ गोलंदाज नसून खालच्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजीही करतो, त्यामुळे त्याची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हान आता दुशान हेमनथा आणि कर्णधारासमोर असेल.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून