65th Maharashtra State Art Exhibition: सांगलीत रंगणार ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन; ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार सन्मान

मुंबई: कला संचालनालयामार्फत आयोजित ‘६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे आयोजित करण्यात येत असून, दि. १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन आवार येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील शासकीय व खासगी कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाते. यंदा राज्यभरातून ३ हजार ,४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असून, त्यापैकी निवड समितीने १,२७५ उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे.


या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.


शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदापासून एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असलेल्या या व्यासपीठावर आता शासकीय रेखाकला परीक्षा (ग्रेड परीक्षा) आणि बालचित्रकला स्पर्धेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सहभागी करून घेण्याचा हा निर्णय कला क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच महाराष्ट्राचा समृद्ध कला वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल.


सांगलीकर कलाप्रेमी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी