Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात सहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गात शिकत घेत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलाच्या पालकांनी दिली. याप्रकरणी चार मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. दुसरीकडे, शाळेने मात्र संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पालकांवरच दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे.



हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला.


राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.


शाळकरी मुलांमध्ये अशा प्रकारची विकृत मानसिकता येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मानसोपचार तज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सांगितलं की, "मोबाईलचा अतिवापर, पॉर्न व्हिडीओ पाहणे, एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांचा एकत्र ग्रुप होणे, अशा कारणामुळे या घटना घडू शकतात. यावर उपाय म्हणजे पालकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे."


सध्या आरोप असलेल्या चार अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत घडणारे असे प्रकार भविष्यात थांबावेत यासाठी शाळा प्रशासन, शिक्षण विभाग काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.


Comments
Add Comment

भूतकाळ आणि वर्तमानाचा रहस्यमय खेळ! ‘संडे १९९६’चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1

Mumbai Apmc Market : सणासुदीच्या तोंडावर ड्रायफ्रूट्स महागले; मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ

मुंबई : सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना

Greater Noida News : ग्रेटर नोएडामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नूडल्स खाल्ल्याने फूड पॉइजनिंगचा प्राथमिक संशय!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामधून (Greater Noida) एक अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौकात महावितरणच्या कार्यालयाला आग, फर्निचर आणि कागदपत्रांचे नुकसान

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौक परिसरात असलेल्या महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील एका