इटलीच्या अष्टपैलू खेळीने नेपाळचा डाव पत्त्यासारखा कोसळला

मुंबई   : टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट साखळीतील सामन्यात इटलीने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नेपाळचा १० गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नेपाळचे १२४ धावांचे आव्हान इटलीने अवघ्या १२.४ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यानंतर अँथोनी मोस्का व जस्टीन मोस्का या दोन भावंडांनी फलंदाजीत दम दाखवला. इटलीच्या या विजयाने क गटात खळबळ उडाली आहे. इटलीने गुणतालिकेत इंग्लंडला मागे टाकले आहे.


इटलीच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. इंग्लंडला विजयासाठी दमवणाऱ्या नेपाळला वानखेडेवर इटलीने जखडून ठेवले. नेपाळच्या पाठिराख्यांनी खच्चून भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर भयाण शांतता होती. इटलीच्या गोलंदाजांनी अनपेक्षित मारा करताना नेपाळला १९.३ षटकांत १२३ धावांवर गुंडाळले. ९६ धावांवर नेपाळची पाचवी विकेट पडली अन् पुढे २७ धावांची भार घालून अख्खा संघ माघारी परतला. कर्णधार रोहित पौडेल ( २३) व आरिफ खेळ (२७) यांच्या विकेटनंतर चित्र बदलले.


या सामन्यात इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इटलीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. ज्या संघाने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला घाम फोडला होता, त्या संघावर इटलीचा संघ भारी पडला. पहिल्या डावात फलंदाजी करताना नेपाळचा संपूर्ण डाव १९.३ षटकात १२३ धावांवर आटोपला. नेपाळकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या आसिफ शेखने २० धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित पौडेलने २३ धावा केल्या. दिपेंद्र सिंग ऐरीने १७ धावा केल्या. तर आरिफ शेखने २७ धावा केल्या. शेवटी करणने १८ धावांचे योगदान दिले. पण नेपाळचा डाव १२३ धावांवर आटोपला.


इटलीच्या गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. २० षटकं टाकण्यासाठी इटलीच्या कर्णधाराने ६ गोलंदाजांचा वापर केला. इटलीकडून बेंजामीन मनेंटीने ४ षटकात ९ धावा खर्च करून २ गडी बाद केले. तर क्रिशन कालुगामगेने ४ षटकात १८ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. तर अली हसन, जेजे स्म्रट्स आणि जसप्रीत सिंग यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.


इटलीला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात अवघ्या १२४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इटलीच्या सलामीवीरांनी नेपाळच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी दिलेलं आव्हान १० गडी राखून पूर्ण केलं. सलामीवीर जस्टीन मोस्काने ४४ चेंडूत नाबाद ६० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. तर अँथनी मोस्काने ३२ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ६ षटकार खेचले. दोघांनी मिळून अवघ्या १२.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि इटलीला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.


थोडक्यात धावफलक: नेपाळ: १२३/१० (१९.३ षटके) - आरिफ शेख २७, रोहित पौडेल २३; क्रिशन कालुगामगे ३/१८, बेन मनेन्टी २/९.
इटली: १२४/० (१२.४ षटके) - अँथनी मोस्का ६२*, जस्टिन मोस्का ६०*.
निकाल: इटली १० गडी राखून विजयी

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त