‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली 'दहा कामांची मर्यादा' आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.


राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री चौहान यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यास होकार दर्शवला असून राज्यात लागू असलेली मर्यादा लवकरच पूर्णपणे उठवली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.


या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि. सुरक्षितरित्या पोहोचवता येईल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Vivo V80 Phone: 7200mAh दमदार बॅटरी, 144Hz डिस्प्लेसह विवोचा नवा 5G फोन येतोय; भारतात केव्हा लाँच होणार?

मुंबई: जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर, थांबा... Vivo कंपनीकडून V सीरीजमधील एक नवा कोरा मोबाईल लाँच

कर्तव्य, धैर्य अन् त्याग! फ्लायदुबई घटनेनंतर उजळल्या नीरजा भानोत यांच्या शौर्याच्या आठवणी

बुधवारी (३० सप्टेंबर २०२६) फ्लायदुबई FZ1073 विमानात झालेला थरार कोणीही विसरू शकत नाही. विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार

Flydubai Incident : ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या अन्....स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, हादरवणारी माहिती समोर

Flydubai Incident : दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर

Trade Agreement : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात; लवकरच अंतरिम करार पूर्ण होण्याची शक्यता

नवी दिल्ल

Dr. Mohan Bhagwat: धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी, जगातील आव्हानांवर भारताच्या ज्ञानपरंपरेत मार्ग

मुंबई: “राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून