Flydubai Incident : ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या अन्....स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, हादरवणारी माहिती समोर

Flydubai Incident : दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे जगभरातून कौतुक होत आहे. कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे विमान धोकादायकरीत्या खाली आले, मात्र कॅप्टन, प्रवासी आणि इतर क्रूच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान आता दुबईवरून इस्रायलच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लायदुबई' विमानातील कॉकपिटमध्ये भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोर सह-वैमानिकाची ओळख पटली असून सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे.



सहवैमानिकाबाबत हादरवणारी माहिती समोर


घटनेनंतर सहवैमानिकाच्या पार्श्वभूमीबाबतही काही गंभीर माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लायदुबईच्या 1073 क्रमांकाच्या विमानातील सहवैमानिकाची ओळख हमाम अल-हम्मामी अशी करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनुसार, ज्या सह-वैमानिकाने कॅप्टनवर चाकूने वार केले आणि विमान जमिनीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल अतिरेकी विचारसरणी बाळगत असल्याचा संशय होता. त्यामुळेच ओमानने त्याला यापूर्वी विमान उडवण्यास बंदी घातली होती. या सह-वैमानिकाची ओळख 'हमाम अल-हम्मामी' (Hamam al-Hammami) अशी पटली असून, घटनेनंतर तीन दिवसांनी त्याचे नाव उघड झाले. विशेष म्हणजे बंदी असूनही फ्लायदुबईने या सह-वैमानिकाला कामावर घेतले आणि त्याने संयुक्त अरब अमिराती व इस्रायल यांना जोडणाऱ्या संवेदनशील मार्गावर विमान उडवण्यास सुरुवात केली. तसेच हमामीच्या अटकेनंतर त्याच्या बॅगेत विविध वस्तू सापडल्या. त्यामध्ये 'फ्री पॅलेस्टाईन' असे लिहिलेली पत्रकेही आढळून आली.



दहशतवादी हेतू होता का ?


या घटनेनंतर हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी हेतू होता का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सहवैमानिकाच्या संभाव्य कट्टरतावादी विचारसरणीबाबत दावे केले आहेत. UAEच्या अॅटर्नी जनरलने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हल्ल्याचे कारण, सहवैमानिकाचा हेतू, पूर्वनियोजन होते का आणि कोणतेही दहशतवादी संबंध आहेत का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. Flydubaiनेही तपास सुरू असल्याचे सांगत या टप्प्यावर कोणत्याही निष्कर्षावर घाई करू नये, असे स्पष्ट केले आहे.



नेमकं काय घडलं ?


30 सप्टेंबर 2026 रोजी Flydubai चे FZ1073 विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने रवाना झाले. Boeing 737 MAX 8 प्रकारचे हे विमान सुमारे 34 हजार फूट उंचीवरून सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीतून जात असताना कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि सहवैमानिकामध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली. इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओमानी सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर विमानाची उंची अचानक मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली.फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार, विमानाने अवघ्या काही सेकंदांत हजारो फूट उंची गमावली. विमानाच्या वेगातही मोठे बदल झाले. परिस्थिती गंभीर होताच विमानातून आपत्कालीन स्थिती दर्शवणारा 7700 आणि त्यानंतर अनधिकृत हस्तक्षेप दर्शवणारा 7500 स्क्वॉक कोड प्रसारित करण्यात आला.



जखमी अवस्थेत कॅप्टन मच्छार यांचा धाडसी प्रयत्न


हल्ल्यात जखमी झाल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार काही काळ कॉकपिटमध्ये खाली पडले होते. मात्र, विमानाची उंची वेगाने कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला.प्रवाशांचे जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर काही प्रवासी आणि क्रू सदस्य कॉकपिटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सहवैमानिकाला विमानाच्या नियंत्रणापासून दूर केले.काही प्रवाशांनी सहवैमानिकाला पकडून ठेवले. विमानात उपस्थित असलेल्या अतिरिक्त वैमानिकांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर FZ1073 विमानाला सौदी अरेबियातील तबूक विमानतळाकडे वळवण्यात आलं.आपत्कालीन परिस्थितीचा सामना केल्यानंतर विमानाने अखेर सुरक्षित लँडिंग केलं. कॅप्टन आणि सहवैमानिक दोघांनाही दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर काही प्रवाशांनाही वैद्यकीय मदत देण्यात आली.यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानातून तेल अवीवला पाठवण्यात आलं.



पंतप्रधान मोदींशी कॅप्टन मच्छार यांचा संवाद


2 ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. कॅप्टन मच्छार यांनी सांगितले की, जखमी अवस्थेत खाली पडल्यानंतर विमान खाली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी विमानातील प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न करून कॉकपिटचा दरवाजा उघडला.



कॉकपिट सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह


FZ1073 मधील या घटनेमुळे विमानाच्या कॉकपिट सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सहवैमानिकाने कॅप्टनवर हल्ला कसा केला? त्याची पूर्व तपासणी कशी झाली? त्याच्यावर पूर्वी कोणती कारवाई झाली होती? आणि तरीही तो संवेदनशील आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान उडवण्याच्या कामावर कसा आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. सध्या UAEच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू असून सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनीही प्राथमिक तपास केला आहे. FZ1073 विमानातील या घटनेचा नेमका घटनाक्रम, हल्ल्यामागील हेतू आणि सहवैमानिकाची पार्श्वभूमी याबाबत अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.

Comments
Add Comment

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर

Trade Agreement : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात; लवकरच अंतरिम करार पूर्ण होण्याची शक्यता

नवी दिल्ल

Dr. Mohan Bhagwat: धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी, जगातील आव्हानांवर भारताच्या ज्ञानपरंपरेत मार्ग

मुंबई: “राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून

Surat- Udaipur Vande Bharat Express: पश्चिम रेल्वेवर सुरू होतेय नवीन वंदे भारत ट्रेन, 7 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण होईल प्रवास; पाहा, वेळ, थांबे, तिकीट दर!

मुंबई: पश्चिम रेल्वेला आता आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. उद्यापासून अर्थात 3 ऑक्टोबरपासून सुरत ते

Flydubai Plane Attack : फ्लायदुबई विमान हल्ला : "ती बातमी ऐकून मी हादरून गेले होते..." - कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया

नवी दिल्ली : फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्येच झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेले भारतीय वैमानिक कॅप्टन

Modi Putin : युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मोदींचे प्रयत्न; पुतिन म्हणाले, “मोदींच्या कल्पना प्रभावी!”

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी