निवडणुकांनंतर अहिल्यानगरमध्ये गोळीबाराची घटना; एकाचा मृत्यू, रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती

अहिल्यानगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात दोन गटांतील वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.


माहितीनुसार, संध्याकाळच्या सुमारास घोडेश्वरी हॉस्पिटलमध्ये दोन गट आमनेसामने आले, आणि दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाले, वाद अधिक वाढल्यानंतर दोन्ही गटांकडून गोळीबार करण्यात आला . यात नितीन शिरसाट यांचा मृत्यू झाला. सुरज फुलमाळी यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिरसाट यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



रुग्णालय परिसरात गोंधळ


नितीन शिरसाट यांच्या मृत्यची बातमी समजताच दोन्ही गटांचे समर्थक घोडेश्वर रुग्णालय परिसरात जमा झाले. काही वेळ तणाव निर्माण होऊन धक्काबुक्की सुद्धा झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रांचा वापर, हल्ल्याचे नेमके कारण आणि यामागील तपास सुरू आहे.


घोडेगाव व आसपासच्या भागात यापूर्वीही गटांतर्गत संघर्षाच्या घटना घडल्याची नोंद आहे. नेवासा - श्रीरामपूर भागात वाळू तस्करी, अनेक अवैध धंदे गावठी कट्ट्या यामुळे या टोळ्यांमध्ये वारंवार गँगवॉर सुरु होता. काहीस राजकीय पाठबळ मिळत असलयाने कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर आव्हानात्मक आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.