ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार


मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.


मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला.


मंत्री सावे म्हणाले, राज्यातील विविध ‘विजाभज’ आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.


या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने होणार असून त्यांच्या सुरक्षित व सुसूत्र प्रवासाची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची निवास व्यवस्था करण्यात आली असून दररोज आवश्यक सर्व सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे. असा उपक्रम विभागामार्फत पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.



९८० शाळांतून निवडलेले १०० गुणवंत विद्यार्थी:


- राज्यातील ९८० विजाभज आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. त्यातून ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.



सहलीचे नियोजन:


विद्यार्थी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पुणे, बेंगलुरू, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत.


- १५ फेब्रुवारी रोजी पुणे - पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियल येथे भेट. १६ फेब्रुवारी पुणे - भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था येथे प्रयोगाधारित विज्ञान कार्यशाळा व शास्त्रज्ञांशी संवाद.


- १६ फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर मंत्री अतुल सावे व विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून इस्त्रो दौऱ्यासाठी हिरवी झेंडी दाखवणार आहेत.


- १७ फेब्रुवारी बंगळुरू – विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय, हिंदुस्तान विमान निर्मिती वारसा संग्रहालय व लालबाग वनस्पती उद्यान भेट.


- १८ फेब्रुवारी तिरुवनंतपुरम (थुंबा) - भारतीय अंतराळ संशोधन संस्था केंद्र, उपग्रह प्रदर्शन विभाग व प्रक्षेपण तंत्रज्ञान गॅलरी भेट; रॉकेट प्रक्षेपणाचे अवलोकन. तसेच नेपियर संग्रहालय व कोवलम समुद्रकिनारा भेट.


- १९ फेब्रुवारी कन्याकुमारी - पद्मनाभपुरम राजवाडा, विवेकानंद शिला स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा, गांधी स्मारक तसेच सूर्यास्त दर्शन.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने