Nashik MNS Protest: शिक्षकाने मराठी बोलण्यास विरोध केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा राडा

नाशिक: नाशिकमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा केल्याची घटना समोर आली आहे. मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फिजिक्सवाला या कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, पोलिसांनी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.


नेमकं प्रकरण काय ?


नाशिकमधील शरणपूर रोड परिसरात फिजिक्सवाला हे प्रसिद्ध कोचिंग सेंटर आहे. या क्लासमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत. मात्र, या ठिकाणी शिकवणारे अनेक शिक्षक हे परराज्यातील असून त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भाषेवरून वारंवार खटके उडत होते.काही विद्यार्थ्यांना हिंदी विषय समजण्यास अडचण येत होती, त्यातूनच वादाची ठिणगी पडली. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना चक्क हिंदीतच शिकावे लागेल, असे बजावत मराठी भाषेला गावठी म्हणून हिनवल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.


मनसे पदाधिकाऱ्यांचा क्लासमध्ये राडा


मराठी भाषेचा अपमान होत असल्याची माहिती मिळताच मनविसेचे शहराध्यक्ष ललित वाघ, उमेश भोई, बाजीराव मते, नितीन धानापुणे, अक्षय कोंबडे आणि रोहित उगावकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी थेट फिजिक्सवाला क्लास गाठला. तिथे त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत गोंधळ घातला. संबंधित पांडे नामक शिक्षकाला समोर आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे आणि मराठी बोलण्यास मज्जाव करणे यावरून वाद विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल


या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी क्लास व्यवस्थापनाला एक गंभीर इशाराही दिला आहे. क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे येत्या ७ दिवसांत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर क्लासची तोडफोड करून पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. या प्रकारानंतर क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी