मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या दरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाला वेग आला असून मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर दिली.


सध्या या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागत आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणानंतर वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.



अधिकाऱ्यांना कडक सूचना


बैठकीदरम्यान शिंदे यांनी विकासकामांचा आढावा घेतला. मंजूर निधीचा योग्य वापर न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



ठाणे परिसरातही प्रकल्पांना गती


ठाण्यातील साकेत उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तसेच कळवा–खारीगाव खाडी पुलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून तोही लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.



पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आदेश


पावसाळ्याआधी सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल पूर्ण करावी, जेणेकरून खड्डे आणि अपघात टाळता येतील, असे निर्देशही देण्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून आले. ग्रामीण भागातील शैक्षणिक व आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी सुमारे १७०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

Comments
Add Comment

Under 19 Asia Cup 2026: शेवटच्या चेंडूवर विजय, मैदानात जल्लोष! पाहा भारताच्या अंडर-19 आशिया कप विजेतेपदाचे खास क्षण

[caption id="attachment_1075318" align="alignnone" width="800"]  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील Under 19 आशिया चषकाचा अंतिम सामना सर्वार्थाने परिपूर्ण होता.

फलंदाजी करताना वेदना होत होत्या, पण...! प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाल्यानंतर आर्यवीर सेहवागने अशा व्यक्त केल्या भावना

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आर्यवीर सेहवागकडून फार अपेक्षा होत्या. खासकरून अंतिम फेरीत आणि तेही

U19 Asia Cup 2026 , IND vs PAK: अंतिम षटकात मनात काय विचार सुरू होते? मोहित उलवाने विजयानंतर मनातलं सांगितलं

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात एक क्षण असा होता की

हायकोर्टाच्या नावाने फसवणूक! 129 वेबसाइट्स ब्लॉक, पीएमओने मागितले स्पष्टीकरण

पंतप्रधान कार्यालयाने आज (१४ नोव्हेंबर) दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांना बोलावून एका मोठ्या पडताळणी

Delhi Red Fort bomb blast : 'स्फोटाशी आमचा संबंध नाही'; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचा न्यायालयात दावा!

लाल किल्ला स्फोट प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवरील आरोप निश्चितीसंदर्भात दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू

Cute Panda Viral Video : मुलीचा तोल गेला अन् थेट पांडाच्या पिंजऱ्यात कोसळली! पुढे जे घडले ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल...

सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात, तर