फलंदाजी करताना वेदना होत होत्या, पण...! प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाल्यानंतर आर्यवीर सेहवागने अशा व्यक्त केल्या भावना

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आर्यवीर सेहवागची बॅट चांगलीच तळपली. त्याने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्याचं फळ त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या रुपाने मिळालं. आशिया कप जेतेपदानंतर आर्यवीर सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आर्यवीर सेहवागकडून फार अपेक्षा होत्या. खासकरून अंतिम फेरीत आणि तेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात.. आर्यवीर सेहवागने आपल्या शैलीला साजेशी फलंदाजी केली आणि भारताच्या विजयात योगदान दिलं. त्याने क्रीडाप्रेमींना जराही निराश केलं नाही. आर्यवीर सेहवागला खरं अंतिम फेरीत दुखापत झाली होती. मात्र या दुखापतीवर मात करत त्याने 61 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानवर सुरूवातीपासून दडपण आलं. विजयानंतर आर्यवीर सेहवाग म्हणाला की, 'मला आता अजिबात वेदना होत नाहीत. आता कोणतीही वेदना उरलेली नाही. मला खूप आनंद होत आहे. आम्ही वेदना आणि बाकी सर्व काही पूर्णपणे विसरून गेलो आहोत. हा खरोखरच एक अविश्वसनीय विजय आहे. आम्ही खूप वेळ आत बसून देवाकडे प्रार्थना करत होतो. प्रामाणिकपणे सांगायचे तर, हा एखाद्या चमत्कारासारखा वाटला. माझ्या अंगावर अजूनही शहारे येत आहेत. एक प्रेक्षक म्हणून मी जे काही पाहिले, त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये, कारण मी बाहेरून सर्व काही पाहत होतो. ही एक अविश्वसनीय भावना आहे. मी या क्षणाचा खूप आनंद घेतला.'



आर्यवीर सेहवाग म्हणाला की..


अंतिम सामन्यात वेदना सहन करत फलंदाजी करण्याबाबत आणि कशामुळे प्रेरणा मिळाली? या प्रश्नावर आर्यवीर म्हणाला की, 'जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो आणि मी भारतासाठी खेळत असतो. हा माझा दुसरा भारत-पाकिस्तान सामना होता. दुर्दैवाने, पहिल्या सामन्यात मी लवकर बाद झालो होतो, त्यामुळे साहजिकच यावेळी मला माझ्या संघासाठी काहीतरी खास करायचे होते. मला खूप वेदना होत होत्या, पण मला मैदान सोडून बाहेर जायचे नव्हते. मला माहित होते की जर मी फलंदाजी सुरू ठेवली, तर मी पाकिस्तानी गोलंदाजीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे दबाव टाकत राहीन आणि मला त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचे होते. या विजयामध्ये मी जे काही योगदान देऊ शकलो, त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे.'







ड्रेसिंग रूममध्ये काय चर्चा झाली होती?


धावांचा पाठलाग करण्यापूर्वी ड्रेसिंग रूममधील चर्चेबाबत आर्यवीर सेहवाग म्हणाला की, खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली आहे आणि हे लक्ष्य फार मोठे नाही, अशी चर्चा ड्रेसिंग रूममध्ये झाली होती. जर आपण नेहमीप्रमाणे सहज फलंदाजी केली आणि आपले नैसर्गिक व पारंपरिक फटके खेळलो, तर आपण हे लक्ष्य नक्कीच गाठू, असा विचार होता. तसेच, आपण या धावांचा यशस्वी पाठलाग करू, असा विश्वास संघात नेहमीच होता.


लक्ष्य खूप मोठे असल्याने तुम्ही खेळण्याच्या रणनीतीत बदल करण्याचा विचार केला नाही का? या प्रश्नावर आर्यवीर म्हणाला की, 'नाही, तसं अजिबात नाही. कारण आम्हाला माहित आहे की आमच्या टीम मीटिंगमध्ये यावर नेहमी बोलणे होते की, खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली असल्याने आपण शेवटच्या 10 षटकांत 100 किंवा 120 धावांचाही पाठलाग कसा करू शकतो. त्यामुळे कोणीतरी शेवटपर्यंत मैदानात टिकून फलंदाजी करणे गरजेचे होते आणि लक्ष्यने तेच करून दाखवले. त्यामुळे त्याला माझा सलाम. आणि अर्थातच, मोहित आणि मनालने शेवटी जे काही केले ते खरोखरच अद्भुत होते, त्यांनाही माझा सलाम.'



आर्यवीरची स्पर्धेतील कामगिरी


आर्यवीर सेहवागने या स्पर्धेतील पाच डावात 361 धावा केल्या आणि एका विक्रमाची नोंद केली. या खेळीत त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली. आर्यवीरने पाचपैकी चार डावांत 50 हून अधिक धावा केल्या. त्याची सरासरी 90.25 आणि स्ट्राइक रेट 95.50 होता.आर्यवीरने 38 चौकार आणि 16 षटकार मारले.

Comments
Add Comment

U19 Asia Cup 2026 , IND vs PAK: अंतिम षटकात मनात काय विचार सुरू होते? मोहित उलवाने विजयानंतर मनातलं सांगितलं

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात एक क्षण असा होता की

U19 Asia Cup 2026: भारताच्या 252 धावांवर 8 विकेट आणि 86 धावांची गरज! पाकिस्तानला 51 चेंडूत अशी दिली मात

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. हा सामना हायव्होल्टेज होणार यात

U19 Asia Cup 2026 अंतिम स्पर्धेत भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय, पाकिस्तानचा हिशेब केला चुकता

एसीसी आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा

IND vs NZ 5th ODI: रोहित शर्माकडे शेवटची संधी! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर पुढचं काय ते ठरणार?

भारत न्यूझीलंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना खऱ्या अर्थाने रोहित शर्मासाठी

उस्मान ख्वाजाकडे पुरावा असेल...! सँडपेपरगेट प्रकरणावर दक्षिण अफ्रिकन खेळाडूंची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियन संघ 2018 मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर होता आणि सँडपेपर प्रकरण घडलं होतं. चेंडूची स्थिती बदलण्यासाठी

IND vs NZ 5th ODI Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. चार सामन्यानंतर मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे.