Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार


मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ‘अॅम्बुलन्स’ सेवेला तांत्रिक बळ मिळणार असून, नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून दुर्गम भागांपर्यंत आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


या निधीतून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासोबतच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील रुग्णवाहिकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवून ती १ हजार ७५६ पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. सध्या महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या सेवेत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात २०० रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात येणार असून त्यात दोन ‘एअर अॅम्बुलन्स’ रुग्णवाहिका आणि पाच सागरी रुग्णवाहिकांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट व बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका, नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिका, फर्स्ट रिस्पॉन्डर बाइक तसेच सागरी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश केला जाणार आहे.


१० वर्षांचा करार:


- नवीन रुग्णवाहिका मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन उपचारांची परिणामकारकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


- १०८ अंतर्गत आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाने ‘सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी १० वर्षांचा करार केला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील आपत्कालीन आरोग्यव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा