मुलुंडमधील मेट्रो दुघर्टनेप्रकरणी चौकशी होणार; महापौर आणि उपमहापौरांनी अपघात स्थळी भेट देवून केली पाहणी

मुंबई : मुलुंड पश्चिम येथे मेट्रो रेल्वेच्या कामात पुलावरील पॅरापेटचा एक भाग अचानक बाजूला होऊन चालत्या ऑटोरिक्षावर कोसळल्याने हा अपघात घडला आहे. या बांधकामात सुरक्षिततेच्या मानकांचा अवलंब करण्यात महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून काही त्रुटी राहिल्या आहेत का ? याची चौकशी केली जाणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी येथील पाहणीदरम्यान माध्यमांशी बोलतांना सांगितले. ही दुर्घटना दुर्दैवी असून याप्रकारच्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी यापुढील काळात योग्य ती खबरदारी घ्यावी,असेही महापौरांनी यावेळी संबंधित प्राधिकरणाला निर्देश दिले आहेत.


मुलुंड (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अँड जॉन्सन परिसराजवळ बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या पुलावारील पॅरापेट भिंतींचा एक भाग निखळून ऑटोरिक्षावर कोसळल्याने एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अपघात स्थळाला नवनिर्वाचित महापौर रितू तावडे व उप महापौर संजय घाडी हे पोहोचले. यावेळी आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह त्यानंतर नगरसेवक प्रकाश गंगाधरे, निल सौमय्या,दिपिका घागही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी अपघात स्थळाची पाहणी करून संबंधित प्राधिकरणाला निर्देश दिले. उपासनी रुग्णालयात जाऊन मृत पावलेल्या रामधान यादव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच जखमी झालेल्या राजकुमार यादव, महेंद्र प्रताप यादव आणि दिपा रुहिया या रुग्णांची विचारपूसही केली .

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण