Thursday, October 15, 2026

मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावरील अपघात स्थळाला महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी, आमदार मिहिर कोटेचा यांची भेट

उपासनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांचे केले सांत्वन

मुंबई : मुलुंड (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अँड जॉन्सन परिसराजवळ बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या खांबाचा काही भाग ऑटोरिक्षावर कोसळल्याने एक पुरुष मृत्युमुखी पडला तर तीन जण जखमी झाले. अपघात स्थळाला महापौर रितू तावडे ,उप महापौर संजय घाडी व आमदार कोटेच्या यांनी आज (दिनांक १४ फेब्रुवारी २०२६) भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर उपासनी रुग्णालयात जाऊन मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच जखमी रुग्णांची विचारपूस केली .

मेट्रोच्या सिमेंटच्या खांबाचा एक भाग अचानक बाजूला होऊन चालत्या ऑटोरिक्षावर कोसळल्याने हा अपघात घडला असून सुरक्षिततेच्या मानकांचा अवलंब करण्यात महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून काही त्रुटी राहिल्या आहेत का? याची चौकशी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ही दुर्घटना दुर्दैवी असून याप्रकारच्या घटना घडू नये, यासाठी यापुढील काळात योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, निल सौमय्या,दिपिका घाग उपस्थित होत्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >