टिपूचे उदात्तीकरण कराल तर... नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात... ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिरं तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्याकडे लक्ष दिले..
तो आमच्या शिवरायांच्या जवळपास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवावे मग बघू... शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? हर हर महादेव! अशी एक्स पोस्ट मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एक्स पोस्ट करून नितेश राणेंनी हा इशारा दिला आहे.


मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर समाजवादी पक्षाच्या निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे फोटो काढून धर्मांध क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा फोटो लावला. यावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी टिपूचे उदात्तीकरण केले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. भाजपनेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाष्याचा निषेध केला. आता मंत्री नितेश राणे यांनी तर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना निर्वाणीचा इशाराच दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना खपवून घेतली जाणार नाही. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे अतिशय निंदनीय आहे. कॉंग्रेसला लाज वाटायला पाहिजे. जोडे चाटण्याची ही पद्धत जन्मात पाहिली नाही. छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतानची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान देणे म्हणणे म्हणजे जोडे चाटणे या जन्मात बघितले नाही. हे खपवून घेतले जाणार नाही. या तुलनेसाठी सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर हिंदुद्वेषी आणि क्रूर टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून काँग्रेसने आपली ‘मुघली विचारधारा’ महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. निष्पाप हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदू स्त्रियांचा छळ करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केली पाहिजे, असे विधान काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले आहे. गेल्याच आठवड्यात तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर बुलडोझर फिरवला होता. पंडित नेहरूंपासून आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करण्याची मुघली परंपरा काँग्रेस पुढे नेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या औरंगजेबप्रेमी काँग्रेसला जनता नक्कीच धडा शिकवणार, अशी टीका भाजपने केली आहे. पाठोपाठ मंत्री नितेश राणे यांनी टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना सुनावले आहे.


टिपूने शेकडो निष्पाप ब्राह्मणांना फासावर लटकवले. हजारो हिंदू मंदिरांचा विध्वंस करून तिथे मशिदी उभारल्या. लाखो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले. हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना आपल्या जनानखान्यात डांबले. अशा 'हिंदुद्वेषी' आक्रमकाचे उदात्तीकरण करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी समजेल अशा भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काढून टिप्याचे फोटो लावून दाखवा मग बघा शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ? असे सांगत मंत्री नितेश राणे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.


Comments
Add Comment

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Nashik : प्रारूप मतदार यादी जाहीर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

Nashik : नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून, यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी तसेच दावे-हरकती

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Navi Mumbai Crime : अवघ्या ४० रुपयांसाठी थेट जीव घेतला! तरुण रिक्षाचालकाची निर्घृण हत्या

नवी मुंबई : अवघ्या ४० रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने