ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे पाकिस्तानपुढे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या आणि पाकिस्तानला २० षटकांत १७६ धावा करण्याचे लक्ष्य दिले.


भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ही कामगिरी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावा केल्या. शिवम दुबेने (धावबाद) १७ चेंडूत २७ तर तिलक वर्माने २४ चेंडूत २५ धावा केल्या. रिंकु सिंगने फक्त ४ चेंडू खेळून एक षटकार आणि एक चौकार मारत नाबाद ११ धावा केल्या.


आजारपणातून उठल्यानंतर थेट पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्माला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने शाहीन आफ्रिदीकरवी शून्यावर झेलबाद केले. हार्दिक पंड्याही शून्य धावा करून परतला. त्याला सईम अयुबच्या चेंडूवर बाबर आझमने झेलबाद केले. अक्षर पटेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर सईम अयुबकडे झेल देऊन परतला. भारताचे सात पैकी तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन तर सलमान आगा, उस्मान तारिक आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.


'ई'शान शो!


ईशान किशनने फलंदाजीतील शानदार शो दाखवून दिला. त्याने दबावात तुफान फटकेबाचीचा नजराणा पेश करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. ईशान किशनचे या टी ट्वेंटी विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक होते. त्याची ही खेळी भारतासाठी मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी आहे. या खेळीसह त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून तिसरे जलद अर्धशतक पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावरही ईशान किशन याने आपल्या नैसर्गिक धाटणीत तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तो शतकी खेळीसह मोठा धमाका करेल, असे चित्र निर्माण झाले असताना भारताच्या डावातील ९ व्या षटकात सईम अयूबच्या चौथ्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ८८ धावांवर भारताने ही विकेट गमावली. त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या.


ईशान किशन टी वर्ल्डकप २०२६ मधील कामगिरी




  • ७ फेब्रुवारी विरुद्ध अमेरिका - २० धावा

  • १२ फेब्रुवारी विरुद्ध नामिबिया - ६१ धावा

  • १५ फेब्रुवारी विरुद्ध पाकिस्तान - ७७ धावा

Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या