Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला आहे. प्रशासनाकडून सुरक्षा आणि सुव्यवस्थेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे.


देशभरातून भक्त दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसरात सिंगल बॅरिकेट्सद्वारे नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त एसपी अन्नपूर्णा सिंग यांनी सुरक्षा व्यवस्था चोख असल्याची माहिती दिली. तसेच यावर्षी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


भारतीय अध्यात्मपरंपरेत भगवान शिव हे संहारक नव्हे तर पुनर्निर्मितीचे प्रतीक मानले जातात. शिवाची उपासना ही केवळ धार्मिक विधी नसून, ती मन, शरीर आणि चेतनेच्या शुद्धीकरणाशी संबंधित एक शास्त्रीय प्रक्रिया आहे.


शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण केल्याने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध अर्पण करण्यामागेही वैज्ञानिक आधार आहे. हे पदार्थ वातावरण शुद्ध करण्यास आणि मनःशांती देण्यास सहाय्यक मानले जातात. शिवाची उपासना म्हणजे अहंकाराचा त्याग, संयमाचे पालन आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची साधना आहे. त्यामुळे शिवपूजा ही श्रद्धेसोबतच विज्ञानाशी जोडलेली आध्यात्मिक साधना मानली जाते.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी