Bengaluru News : आनंदाच्या क्षणांवर विरजण! आईच्या मॅटर्निटी फोटोशूट दरम्यान ३ वर्षांच्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू

बंगळुरू : आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी आणि त्या आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आईचं 'मॅटर्निटी फोटोशूट' सुरू होतं. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात काळाने घाला घातला आहे. फोटोशूट सुरू असताना ३ वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या कुंडात (Water Pool) पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत घडली आहे.


लक्ष्मीर असं मृत चिमुरड्याचं नाव असून, तो चरण आणि स्वाती यांचा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती या आठ महिन्यांच्या गरोदर आहेत. शनिवारी त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनानिमित्त एका विशेष फोटोशूटचे आयोजन करण्यात आले होते. फोटोशूट सुरू असताना लक्ष्मीर जवळच खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याचा पाय घसरला आणि तो तिथल्याच एका लहान कृत्रिम पाण्याच्या कुंडात पडला.



दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, फोटोशूटमध्ये सर्वजण इतके दंग होते की, लक्ष्मीर पाण्यात पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. जेव्हा लोकांचे लक्ष गेले, तेव्हा खूप उशीर झाला होता. लक्ष्मीरला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


लक्ष्मीरचे वडील चरण हे नोकरीनिमित्त परदेशात होते. ते आज बंगळुरूत परतणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या वडिलांच्या स्वागतासाठी लक्ष्मीर उत्सुक होता, त्यांना आता आपल्या मुलाचा मृतदेह पाहावा लागणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. फोटोशूटच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना होत्या का? आणि हा प्रकार आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

कर्तव्य, धैर्य अन् त्याग! फ्लायदुबई घटनेनंतर उजळल्या नीरजा भानोत यांच्या शौर्याच्या आठवणी

बुधवारी (३० सप्टेंबर २०२६) फ्लायदुबई FZ1073 विमानात झालेला थरार कोणीही विसरू शकत नाही. विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार

Flydubai Incident : ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या अन्....स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, हादरवणारी माहिती समोर

Flydubai Incident : दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर

Trade Agreement : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात; लवकरच अंतरिम करार पूर्ण होण्याची शक्यता

नवी दिल्ल

Dr. Mohan Bhagwat: धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी, जगातील आव्हानांवर भारताच्या ज्ञानपरंपरेत मार्ग

मुंबई: “राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून

Surat- Udaipur Vande Bharat Express: पश्चिम रेल्वेवर सुरू होतेय नवीन वंदे भारत ट्रेन, 7 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण होईल प्रवास; पाहा, वेळ, थांबे, तिकीट दर!

मुंबई: पश्चिम रेल्वेला आता आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. उद्यापासून अर्थात 3 ऑक्टोबरपासून सुरत ते