वर्ल्डकपमध्ये जागा टिकविण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथला निमंत्रण

मुंबई  : दुखापतींचे ग्रहण, खराब फॉर्म आणि झिम्बाब्वेविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव यामुळे ऑस्ट्रेलियावर प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागण्याची नामुष्की ओढवू शकते. हा प्रसंग ओढवू नये यासाठी ऑस्ट्रेलियाने माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथला संघात समाविष्ट केले आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड संघाचा भाग होता. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेत खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले. हेझलवूडच्या ऐवजी स्मिथला संघात संधी मिळाली आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा टी २० सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये खेळला आहे. पण नुकत्याच झालेल्या बिग बॅश स्पर्धेत स्मिथने सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळताना ६ सामन्यात १६७च्या स्ट्राईकरेटने २९९ धावा केल्या आहेत.
दुखापतीमुळे कर्णधार मिचेल मार्श दोन लढती खेळू शकलेला नाही. उर्वरित सामन्यात तो खेळू शकेल का याविषयी साशंकता आहे. मार्शला पर्याय म्हणून स्टीव्हन स्मिथला श्रीलंकेत पाचारण करण्यात आले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीपूर्वी स्मिथ श्रीलंकेत दाखल होऊ शकला नाही. मात्र त्यानंतर काही तासात तो दाखल झाला आहे.


सलामीच्या लढतीत मिचेल मार्श खेळला नाही. टीम डेव्हिड दुखापतीतून पूर्णपणे सावरला नव्हता. जोश हेझलवूडऐवजी बदली खेळाडूची घोषणा झाली नव्हती. ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह शॉन अबॉट उपस्थित होता पण तो १५ सदस्यीय संघाचा भाग नव्हता. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे निवडीसाठी बाराच खेळाडू उपलब्ध होते.


टेस्ट आणि वनडे कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. हेझलवूडलाही बाहेर जावे लागले. मिचेल स्टार्कने टी २० प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. हे त्रिकुट ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावते. पण या स्पर्धेत हे तिघेही नाहीत. यामुळे नॅथन एलिस, बेन ड्वारशियॉस, झेव्हियर बार्टलेट या नव्या दमाच्या वेगवान गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाची भिस्त आहे. दरम्यान मिचेल मार्श फिट होऊन परतेल, असा विश्वास संघव्यवस्थापनाला असल्याने त्याच्याऐवजी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही. हेझलवूडच्या जागी स्मिथला संघात घेण्यात आले आहे. अशा बदलासाठी आयसीसीच्या तांत्रिक समितीची मंजुरी लागते. ती मिळाल्याने स्मिथचा प्रवेश झाला आहे. भारत आणि श्रीलंकेतील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर स्मिथची कामगिरी उत्तम अशी आहे. झिम्बाब्वेविरुद्धची पडझड पाहता ऑस्ट्रेलियाला खंबीर फलंदाजाची आवश्यकता आहे. स्मिथ ही उणीव भरून काढू शकेल.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून