इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी विजय

नवी दिल्ली  : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्येप्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून वेस्ट इंडिजने आधीच पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित केला होता आणि इंग्लंडने सोमवारी इटलीवर विजय मिळवून आगेकूच केली. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीने त्यांच्या प्रदर्शनाने क्रिकेट चाहत्यांचे मन मात्र जिंकले. नेपाळला पराभूत केल्यानंतर इटलीचा आत्मविश्वास कमालिचा वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळेच समोर २०३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य असूनही हा संघ डगमगला नाही. शेवटपर्यंत त्यांनी विजयासाठी जोर लावला, परंतु इंग्लंडचा अनुभव कामी आला व २४ धावांनी इटलीचा संघ पराभूत झाला.


क गटातून सुपर ८ चे स्थान निश्चित करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला कोलकाताच्या इडन गार्डनवर इटलीने जेरीस आणले होते. फुटबॉलच्या मैदानावर या दोन्ही देशांमधील लढती रोमहर्षक राहिल्या आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावर तिच ठसन पाहायला मिळाली. नेपाळला पराभूत करून वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवल्यानंतर इटलीचा आत्मविश्वास किती वाढलाय, हे इंग्लंडविरुद्ध पाहायला मिळाला. इंग्लंडचा निम्मा संघ त्यांनी १०५ धावांत तंबूत पाठवला होता.


जॉस बटलर ( ३), जेकब बेथेल ( २३), फिल सॉल्ट ( २८), कर्णधार हॅरी ब्रूक ( १४) व टॉम बँटन ( ३०) यांना इटलीच्या गोलंदाजांनी शांत ठेवले. पण, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल जॅक्सने सामना ३६० डिग्री कोनात फिरवला. त्याने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, जे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील इंग्लंडकडून झालेले वेगवान अर्धशतक ठरले. त्याने इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडला. जॅक्सने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करताना संघाला ७ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले.


इटलीच्या ग्रांट स्टीवर्ट व क्रिशन कलनगामागे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इटलीची सुरुवात काही खास झाली नाही. जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात अँथोनी मोस्का ( ०) व जेजे स्मट्स ( ०) यांना बाद केले. त्यानंतर जेमी ओव्हरटनने कर्णधार हॅरी मॅनेटीला ( १२) माघारी पाठवून इटलीची अवस्था ३ बाद २२ अशी केली. आता इथून इटली काय डोकं वर काढत नाही, असे इंग्लंडला वाटले. पण, जस्टीन मोस्का व बेन मॅनेटी ही जोडी मैदानावर उभी राहिली.


बेनने २२ चेंडूंत अर्धशतक ठोकले आणि इडन गार्डनचे सर्व कोपरे चौकार-षटकारांनी व्यापले. विल जॅक्सने टाकलेल्या १२ व्या षटकात मॅनेटीने ४,६,६,४ असे फटके खेचले. पण, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नान मॅनेटी झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ६० धावांची वादळी खेळी केली. मोस्का व मॅनेटी जोडीने पाचव्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ९२ धावा जोडल्या. या दोघांनी इंग्लंडच्या नाकी नऊ आणले होते. मोस्काने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला, परंतु आदिल राशिदच्या गोलंदाजीवर तो फसला. मोस्का ३४ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावांवर बाद झाला.


इटलीला ३० चेंडूंत ६१ धावा हव्या होत्या आणि इंग्लंडने शेवटच्या पाच षटकांतच ७१ धावा चोपल्या होत्या. त्यामुळे इटलीसाठीही हे लक्ष्य शक्य होते. पण, सॅम कुरनने एकाच षटकात त्यांना दोन धक्के दिले. मार्कस कॅम्पोपियानो ( २) व जिएय-पिएरो मीड ( ०) हे बाद झाले. १८व्या षटकात ग्रांट स्टीवर्टने २१ धावा कुटल्या आणि सामना १२ चेंडूंत ३० धावा असा जवळ आणला. सॅम करन पुन्हा एकदा इंग्लंडसाठी संकटमोचक ठरला. त्याने १९ व्या षटकात फक्त ५ धावा देत १ विकेट घेतली. स्टीवर्ट २३ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. करनने २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इटलीचा संघ १७८ धावांत ऑल आऊट झाला. ओव्हरटनने तीन बळी टिपले.

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव