राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; २६ फेब्रुवारीला होणार औपचारिक घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत या विषयावर तूर्तास पडदा टाकण्यात आला आहे. "विलीनीकरणाच्या संदर्भात तूर्तास कोणतीही चर्चा नको. पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी या विषयावर माध्यमांसमोर कोणतेही भाष्य करू नये," अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. सध्या केवळ पक्ष संघटना वाढवणे आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना नेतृत्वाने दिल्या आहेत.


दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. याच दिवशी पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली जाईल. या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या