मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील - मंत्री नितेश राणे

मुंबई: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना शासनामार्फत लवकरात लवकर राबविण्यात येतील, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.


पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस खासदार हेमंत सावरा, आमदार मनीषा चौधरी, आमदार राजेंद्र गावित, पदुमचे सचिव रामास्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पालघर येथे मत्स्य विद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरीय होलसेल मच्छी मार्केट सुरू करणे, तसेच मच्छीमारांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी विमा योजना प्रभावीपणे राबविणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.





सातपाटी मच्छिमार बंदरातील विकासकामे, धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची गरज, तसेच नियंत्रित मासेमारी व मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


राज्यातील अलीकडील वादळी वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मच्छीमारांच्या नौकांसह मासळीचे झालेले नुकसान याबाबतही सखोल आढावा घेण्यात आला. तसेच सरंगा माशाला राज्य मासा दर्जा देण्यासंदर्भात पुढील कार्यवाही, पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढविण्याबाबत विचार, LED व अनियमित मासेमारीवर नियंत्रण, तसेच मत्स्य कल्याणकारी महामंडळाच्या कार्यप्रणालीतील सुधारणा या विषयांवरही मंत्री राणे यांनी चर्चा केली.


पेंच जलाशय महाराष्ट्र मत्स्यउद्योग विकास महामंडळाकडून मत्स्य व्यवसाय विभागास चालविण्यास देण्याबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी