सुनेत्रा, पार्थ पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

- अजित पवारांच्या विमान अपघाताची 'सीबीआय'मार्फत चौकशी करण्याची मागणी


मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची 'सीबीआय'मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक सविस्तर निवेदन देण्यात आले.


या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि युवा नेते पार्थ पवार उपस्थित होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार सुनील तटकरे यांनी माहिती दिली की, "अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला, त्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे".


दरम्यान, या निवेदनाची दखल घेत राज्य सरकार उद्या केंद्र सरकारकडे या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यासंदर्भात केंद्र सरकारशी आवश्यक तो पत्रव्यवहार करतील आणि त्यादृष्टीने पावले उचलली जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण