धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून केल्याची घटना सोमवारी (१६ फेब्रुवारी) मध्यरात्री घडली. ६० वर्षीय महिलेच्या खुनाची बातमी समोर येताच केवळ दोन तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. माणिकपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास पूर्ण करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


बऱ्हाणपूर उमेळमान गावातील ‘भीमाई’ नावाच्या बंगल्यात दुर्गा संजय बनसोडे या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा वालीव येथे राहत असून, सोमवारी दिवसभर संपर्क न झाल्याने आईची काळजी वाटली म्हणून आईला भेटण्यासाठी तो रात्री घरी आला आणि त्याला घरात हॉलमध्ये रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर तातडीने त्याने पोलिसांना कळवलं.


पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तेव्हा त्यांना डरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. बेडरूम मधील बेडवरची गादी बाजूला काढण्यात आली होती तसेच खोलीच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आल्याचे दिसून आले. यावरून गुन्हा पूर्वनियोजित असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला .



कौटुंबिक रागातून गुन्हा?


मृत महिलेने काही कारणावरून ओरडल्याचा राग मनात धरून आरोपीने आपल्या १६ वर्षीय मित्राच्या मदतीने हे टोकाचे उचलल्याचे पोलिसांनी संगितले. आरोपी मुलगा हा महिलेच्या भावाचा मुलगा असून त्या महिलेच्या घराच्या जवळच राहत होता.


कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे वसई परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांकडून घडलेल्या या गुन्ह्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून