Mumbai: महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड भरावा लागणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांना दंड ठोठावला आहे. या दोन अधिकाऱ्यांना म्हणजे अतिरिक्त उपायुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव यांना न्यायालयाने प्रत्येकी ११ रुपयांचा दंड केला आहे. हा दंड त्यांच्या मासिक वेतनातून दोन दिवसात कट करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर आणि न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबावर उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना न्यायालयाने प्रत्येकी ११ रुपयांचा प्रतिकात्मक दंड ठोठावला आहे.


​फोर्ट परिसरातील एका इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दोन वेळा दिले होते. परंतु, पालिकेच्या वतीने या आदेशांचे पालन करण्यास वारंवार विलंब करण्यात आला. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने यावेळी दिला.


​विशेष म्हणजे, हा दंड या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून येत्या दोन दिवसात कापून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. "केवळ अकरा रुपये का?" असा प्रश्न उपस्थित होत असताना, न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, दंडाची रक्कम महत्त्वाची नसून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायलाच हवी, हा संदेश पालिकेच्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचावा, हाच आमचा मूळ हेतू आहे.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य