पाकिस्तानचा सुपर ८ मध्ये प्रवेश, नामिबियाचा केला पराभव

कोलंबो : नामिबिया विरूद्धच्या सामन्यात १०२ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानने सुपर ८ फेरीत प्रवेश केला. कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत ३ बाद १९९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या नामिबियाचा डाव १७.३ षटकांत ९७ धावांवर आटोपला. या सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने नाबाद शतक केले. तोच सामनावीर झाला.


नामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने २३, जॅन फ्रायलिंकने ९, जॅन निकोल लॉफ्टी-ईटनने ५ (धावबाद), गेरहार्ड इरास्मसने ७, अलेक्झांडर वोल्शेंकने २०, जेजे स्मितने ९, झेन ग्रीनने ७, रुबेन ट्रम्पेलमनने शून्य, विलेम मायबर्गने ८, बर्नार्ड स्कोल्झने १, जॅक ब्रासेलने नाबाद १ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून उस्मान तारिकने ४, शादाब खानने ३, मोहम्मद नवाजने १ आणि सलमान मिर्झाने १ विकेट घेतली.


पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने नामिबिया विरुद्ध खेळताना ५८ चेंडूत ४ षटकार आणि ११ चौकार मारत नाबाद १०० धावा केल्या. सईम अयुब १४, सलमान आगा ३८, ख्वाजा नाफे ५ धावा करुन परतला. शादाब खानने नाबाद ३६ धावा केल्या. नामिबियाकडून जॅक ब्रासेलने २ तर गेरहार्ड इरास्मसने १ विकेट घेतली.


भारतापाठोपाठ पाकिस्तानही सुपर ८ फेरीत


अ गटातून (ए ग्रुप) अनुक्रमे भारत आणि पाकिस्तान हे दोन देश सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. ब गटातून (बी ग्रुप) श्रीलंका आणि झिम्बाब्वे, क गटातून (सी ग्रुप) वेस्ट इंडिज आणि इंग्लंड, ड गटातून (डी ग्रुप) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ सुपर ८ (सुपर एट) फेरीसाठी पात्र झाले आहेत. उर्वरित १२ संघांचे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील आव्हान संपले आहे. पाकिस्तान हा सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरलेला आठवा संघ ठरला.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून