शिक्षिकेच्या मारहाणीमुळे विद्यार्थिनीच्या हातावर जखमा, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई : घरगुती शिकवणी वर्गात विद्यार्थिनीला शारीरिक शिक्षा दिल्याचा आरोप पुढे आला असून या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला पाढे पाठ नसल्याच्या कारणावरून शिक्षिकेने मारहाण केल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे.



नेमकं घडलं काय ?


नवी मुंबईतील गोठीवली परिसरात राहणारी संबंधित विद्यार्थिनी नियमितपणे एका खासगी शिकवणीला जात होती. पूर्ण पाढे पाठ न केल्याने शिक्षिकेने संतापाच्या भरात तिला पलित्याने मारहाण केली असाआरोप कुटुंबीयांनी केला आहे.


पलित्याने मुलीच्या हातावर अनेक वेळा मारण्यात आले, जवळपास ४० वेळा त्यानंतर हात सुजला असून जखमा झाल्या आहेत शिवाय मुलीचा हात प्रचंड दुखातही आहे.



प्रकार उघडकीस कसा आला?


घरी आल्यानंतर मुलीने घडलेली घटना आईला सांगितली. हातावर आलेली सूज आणि दुखणं लक्षात येताच कुटुंबीयांनी शिक्षिकेशी संपर्क साधला. मात्र, आरोपानुसार शिक्षिकेने विद्यार्थिनी अभ्यास करत नसल्याचे सांगत आपण जे केले ते अगदी योग्यच आहे. अडचण असल्यास दुसरीकडे शिकवणी लावावी, असे उत्तर दिल्याचा दावा आहे.



पोलिसांत नोंद, तपासाची प्रक्रिया सुरू


या प्रकरणी पालकांनी रबाळे पोलीस ठाणे येथे लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत चौकशी सुरू केली असून दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले जात आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण