शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या वाहतुकीत होणार 'हे' महत्वाचे बदल

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी केली जाईल. अनेक मिरवणुका, महाराजांचे आणि मावळ्यांचे देखावे, पालख्या निघतील. जयंती अगदी सण असल्यासारखी संपूर्ण महाराष्ट्र साजरी केली जाणार आहे. यामुळे रस्त्यांवर, चौकांमध्ये अनेक लोक एकत्र जमलेले असतील. त्यामुळे वाहतुकीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ही अडचण होऊ नये म्हणून पुण्याच्या रस्ते वाहतुकीत काही महत्वाचे बदल केले गेले आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सकाळी सातपासून सायंकाळी गर्दी निवळेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.



शिवाजी रस्ता


जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनाही स. गो. बर्वे चौक- जंगली महाराज रास्ता- खंडुजीबाबा चौक- टिळक चौक- टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.



केळकर रस्ता


केळकर रस्त्यामार्गे अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरु असताना सोन्या मारुती चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक (समर्थ विभाग ) मार्गे वळविण्यात येईल



पुरम चौक


पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगराकडे जाणाऱ्या वाहनांनी पुरम चौक- टिळक रस्ता -अलका टॉकीज चौक - एफ सी रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरु झाल्यानंतर अप्पा बळवंत रस्त्यामार्गे सरळ पुढे वळविण्यात येईल. मिरवणुका गाडगीळ पुतळा पस होईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल - बालगंधर्वकडे इच्छितस्थळी जातील.


मिरवणुका गाडगीळ पुतळा येथून पुढे जाईपर्यंत शनिवारवाड्याकडे जाणारी कॉसमॉस बँक जंक्शन - बालगंधर्व - टिळक पुलामार्गे वळविण्यात येईल. स.गो. चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो. चौक - जंगली महाराज रस्ता- झाशी राणी चौक येथून आपल्या ठिकाणी जावे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक वाहन वापर टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी