शिक्षण आयुक्तालय इमारतीच्या कामाला गती द्या; शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

मुंबई: पुणे येथील शिवाजीनगर भागातील भांबुर्डा परिसरात शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीमुळे शालेय शिक्षण विभागाची कार्यालये एकाच छताखाली येतील. इमारतीचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले.


मंत्रालयात आयोजित बैठकीत इमारत बांधकामाचा आढावा घेताना राज्यमंत्री बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव एम.बी. ताशिलदार, शालेय शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक हारून अत्तार, कक्ष अधिकारी शितल पाटील आदी उपस्थित होते.


राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, इमारतीमध्ये शिक्षण संचालक, शालेय पोषण आहार, प्राथमिक शिक्षण विभाग यांची कार्यालये व विश्रामगृह आहेत. इमारतीच्या आवारात पर्याप्त पार्किंगची व्यवस्था असावी.शालेय शिक्षण विभागाचे पुणे येथील आयुक्तालयाची इमारत विभागाचा लौकिक ठरणार आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम दर्जेदार करण्यात यावे. इमारत बांधकामाला विलंब करण्यात येऊ नये.


विभागाने संबंधित कंत्राटदाराकडून विविध कालमर्यादेत काम पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी. इमारत बांधकामातील सर्व अडचणी दूर करण्यात याव्या, अशा सूचनाही राज्यमंत्री डॉ पंकजा भोयर यांनी दिल्या.



इमारतीविषयी थोडक्यात


 

शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या इमारतीचे बांधकाम 414 चौरस मीटर जागेत होत आहे. इमारत परिसरात 377 वाहनांची क्षमता असलेले दोन वाहन तळ आहेत. इमारतीमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी बैठक व भोजनकक्ष, स्वागत कक्ष, उपहारगृह, प्राथमिक शिक्षण कार्यालय, संचालक कार्यालय, शिक्षण संचालक माध्यमिक व प्रौढ शिक्षण कार्यालय, नोंदणी कक्ष, शालेय पोषण आहार कार्यालय, ग्रंथालय, प्राथमिक शिक्षण परिषद व ई गव्हर्नन्स कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालय आणि विश्रामगृह यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा