Pune: शिवनेरी गडावर चेंगराचेंगरी; लहान मुलांसह महिला जखमी

पुणे: शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर भाविक मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. परंतु, गर्दी सतत वाढत असल्याने पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास अपयश आले. यादरम्यान गर्दीमध्ये लहान मुले आणि महिला देखील होत्या. शिवनेरी गडावर चेंगराचेंगरीची घटना घडली असून अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत.


पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवजन्मस्थळ शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेले नागरिक यामुळे गड परिसर रात्रीपासूनच गजबजला होता. शिवजयंती म्हटले की, शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त लोकांची मोठी गर्दी जमली होती. पण, गर्दी वाढत होती आणि पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी केली. या गर्दीला नियंत्रित करणे पोलिसांनाही शक्य होत नव्हते. त्यामध्येच गर्दी सातत्याने वाढत राहिली.



शिवनेरी गडावर चेंगराचेंगरी


 

अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. रस्ते अरुंद असल्याने आणि एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक पुढे सरकल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या घटनेत काही महिला व लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.


जखमी नागरिकांना तातडीने जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा