भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात आहेत या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे.



तर झालं असं


मागच्या आठवड्यात भिगवण येथे जे घडल ते संपूर्ण राज्याला हादरवणारे होत. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत मुलीला पळवून नेले, आणि काही दिवसांनी त्याच मुलीने आपण स्वखुशीने पळून आलोय असा व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. हा खटला न्यायालयात मांडण्यात आला.


जबाब नोंदवून झाल्यानंतर मुलगी न्यायालयाच्या आवारातून बाहेर आली. समोर तिची आई मुलीच्या भेटीसाठी आस लावून बसली होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या... गहिवरलेल्या मनाने 'माझी मुलगी मला परत द्या' अशी गयावया करत होती. मात्र मुलीला आईच्या मायेचा पाझर फुटला नाही. आईकडे न पाहता मुलीने पोलिसांच्या गाडीकडे धाव घेतली.



आईच म्हणणं काय आहे?


एकीकडे तरुणी स्वतःच्या इच्छेने गेल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे तिच्या आईने माझी मुलगी पळून गेलेली नाही, तिला जबरदस्तीने नेण्यात आले, असा आरोप केला आहे. दोघांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तरुणी आणि तिच्या आईच्या विधानांमध्ये प्रचंड तफावत असल्याने या प्रकरणाचा नेमका छडा लागेपर्यंत तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


दरम्यान न्यायालयासमोर दंड प्रक्रिया संहिता कलम १६४ अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात तरुणीने आईकडे जाण्यास नकार दिला आहे. सध्या तिला सुधारगृहात ठेवून समुपदेशन केले जाणार आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी