Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार

मुंबई: महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी २०२६च्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे. या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे. कारण, जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागानं निधीची जमवाजमव सुरु केली आहे. सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी ९८. ४५ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागानं ९८. ४५ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. याबाबतचा शासन निर्णय १८ फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे.



जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार



महिला व बाल विकास विभागाकडून जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आणि जानेवारी २०२६ च्या सुरुवातीच्या काही दिवसात देण्यात आला होता. यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. आता सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी ९८. ४५ कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्यानं लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसात लाडकी बहीणच्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी