Baloch Pakistan Conflict : पाकिस्तानचे अनेक जवान बलूचच्या ताब्यात; पाकिस्तानी जवानांकडून मदतीची हाक

आपल्या ताब्यात अनेक पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलएने केला आहे. मात्र पाकिस्तानकडून बलूच लिबरेशनचा हा दावा खोटा ठरवण्यात आला आहे.



पाकिस्तानी जवानांकडून मदतीची हाक :


बीएलए ने आपल्या अधिकृत मीडिया विंग ‘हक्कल’ मार्फत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सैन्याचे आठ जवान कॅमेऱ्यासमोर उभे राहून आपले अधिकृत सेवा ओळखपत्र (सर्व्हिस आयडी) आणि राष्ट्रीय ओळखपत्र दाखवत आहेत. हे सैनिक रडत रडत पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तात्काळ मदतीची विनंती करताना दिसत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला बीएलए ने पाकिस्तानी सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. या कालावधीत कैद्यांच्या अदलाबदलीसाठी चर्चा सुरू झाली नाही, तर बंदिवानांना फाशी देण्याची कठोर चेतावणी देण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही अंतिम मुदत उद्या म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी संपत आहे.



बीएलएचे ऑपरेशन हेरोफ :


बीएलए च्या म्हणण्यानुसार, हे सर्व कैदी ‘ऑपरेशन हेरोफ’च्या दुसऱ्या टप्प्यात पकडले गेले होते. काही जणांना त्यांच्या बलूच वांशिक ओळखीच्या आधारे आधीच सोडण्यात आले आहे, कारण ते स्थानिक पोलिसांशी संबंधित होते. मात्र उर्वरित कैदी पाकिस्तानी सैन्याच्या युनिटचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे आणि त्यांच्यावर बलूच नॅशनल कोर्टात औपचारिक कारवाई सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.


दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने हे सर्व दावे फेटाळून लावत म्हटले आहे की आमचा कोणताही सैनिक बेपत्ता नाही किंवा कोणाच्याही ताब्यात नाही. तसेच त्यांनी कैद्यांच्या अदलाबदलीची प्रक्रिया पूर्णपणे नाकारली आहे.


तरीही बीएलए ने तात्काळ चर्चेला सुरुवात करण्याची मागणी पुन्हा केली आहे. अल्टिमेटमची मुदत संपायला केवळ एक दिवस बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेत काहीही पाऊल उचलले गेले नाही, तर पाकिस्तानी सैन्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आतापर्यंत पाकिस्तानी लष्कराकडून आणि शहबाज शरीफ सरकारकडून या व्हिडिओबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.