घटस्फोटाच्या मालिकेत अजून एका क्रिकेटरची भर; "मी हा चॅप्टर क्लोज करतोय" म्हणत क्रिकेटरने केली घटस्फोटाची घोषणा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात घटस्फोटांची मालिका सुरु आहे. अशातच आता या मालिकेत अजून एका भारतीय क्रिकेटपटूची भर पडली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया वरून आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे.


भारतीय फिरकी गोलंदाज राहुल चहरने शुक्रवारी (२० फेब्रुवारी) त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. राहुलने त्याची पत्नी इशानी जोहर सोबत ९ मार्च २०२२ रोजी गोव्यात लग्न केले. २० फेब्रुवारी रोजी, त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ही बातमी शेअर केली आणि सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न मोडल्याचे त्याने सांगितले.


राहुल म्हणतो की, खूप लवकर, म्हणजे खूप तरुण वयात लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मला स्वतःची पूर्ण समज नव्हती. मला नेमकं काय हवं आहे, माझी मूल्ये काय आहेत आणि मला कोणत्या प्रकारचे आयुष्य घडवायचे आहे, हे मला नीट समजले नव्हते. घटस्फोटाची ही प्रक्रिया सोपी नव्हती. राहुलने सांगितले की, गेले १५ महिने तो कोर्टाच्या चकरा मारत होता. त्याने या काळाचे वर्णन भावनिकदृष्ट्या थकवणारे असे केले आहे, परंतु याच काळात त्याला संयम आणि लवचिकता शिकायला मिळाली. तो पुढे म्हणतो, हा एक असा धडा (chapter) होता जो कायम टिकण्यासाठी नव्हता, तर तो काहीतरी शिकवण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी होता. विशेष म्हणजे त्याने कोणावरही आरोप किंवा चिखलफेक केलेली नाही.





हार्दिक पांड्या, शिखर धवन, शेहवाग, आणि चहलचाही घटस्फोट :


दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये टीम इंडियामधील क्रिकेटरांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ सुरुच आहे. हार्दिक पांड्या, माजी सलामीवीर शिखर धवन, शेहवाग तसेच फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यांचाही घटस्फोट झाला आहे. हार्दिकने माहिरा शर्माशी नव्याने आयुष्य सुरु केलं आहे. चहलच्या घटस्फोटानंतर पुन्हा आरजेसोबत सूत जुळल्याची चर्चा होती, पण तिथंही वादळ आल्याची चर्चा आहे. शिखर धवनने दुसरी इनिंग सुरु करताना पुन्हा विदेशी गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम