भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत

कांगारूंच्या भूमीत तिरंगा फडकवण्याची महिला संघाला संधी


ॲडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामधील टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत असून, शनिवारी होणारा तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारतीय महिलांकडे आहे.


मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवत जोरदार सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पलटवार करत १९ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोलने (८८ धावा) आणि बेथ मुनीने दिलेल्या १२८ धावांच्या सलामीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.


मागील सामन्यात भारताची मधली फळी गडगडल्याने विजयाची संधी हुकली होती. त्यामुळे उद्याच्या निर्णायक सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्याकडून आक्रमक सलामीची अपेक्षा आहे. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांना मोठी खेळी करावी लागेल. गोलंदाजीत रेणुका सिंग आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर सुरुवातीचे धक्के देण्याची जबाबदारी असेल.


विक्रमी हरमनप्रीतवर सर्वांच्या नजरा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५६ सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या हरमनप्रीत कौरसाठी हा सामना वैयक्तिकरीत्या खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी ती मालिका विजयासाठी जीवाचे रान करेल, यात शंका नाही.


सामन्याचा तपशील :
सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरी टी-२०)
 भारतीय वेळ : दुपारी १. ४५.
 स्थळ : ॲडलेड ओव्हल, ऑस्ट्रेलिया

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या