समुद्रमार्गाने गाठा कोकणाची वाट; मुंबई–विजयदुर्ग रो रो फेरी १ मार्चपासून सेवेत; जाणून घ्या वेळ आणि तिकीट

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी समुद्रमार्गाचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो रो फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत असून, या सुविधेमुळे रस्त्यावरील दीर्घ आणि वाहतूक कोंडीचा प्रवास टाळता येणार आहे.


आणि याचे उदघाटन सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे उदघाटन करणार आहेत.



असा असेल प्रवासाचा आराखडा


‘एम२एम प्रिंसेस’ ही फेरी सकाळी ८ वाजता मुंबईतून भाऊच्या धक्क्यावरून सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीची फेरी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून निघून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल. एकूण प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा असेल.



मार्च २०२६ मधील फेऱ्या


मुंबई ते विजयदुर्ग : १, ४, ७, ११, १४, १८, २१ आणि २५ मार्च
विजयदुर्ग ते मुंबई :२, ५, ८, १२, १५, १८, २२ आणि २६ मार्च



भाडे तपशील


इकॉनॉमी – २,५०० रुपये
प्रीमियम इकॉनॉमी – ४,००० रुपये
बिझनेस क्लास – ७,५०० रुपये
फर्स्ट क्लास – ९,००० रुपये
दुचाकी – १,००० रुपये
सायकल – ६०० रुपये
चारचाकी – ६,००० रुपये
बस – १३,००० ते २१,००० रुपये



कोकणाला नवा पर्याय


समुद्रमार्गामुळे प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पर्यटन हंगामात या सेवेचा फायदा होणार असून स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने