शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न केले. सोफी प्रॉडक्ट कन्सल्टंट क्षेत्रात करिअर करत आहे.


शिखर आणि सोफी यांचा साखरपुडा याच वर्षी १२ जानेवारी रोजी झाला आणि जेमतेम दीड महिन्यात त्यांनी लग्न केले. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शिखर धवन आणि सोफी शाइन यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.


शिखर धवन आणि त्याची पहिली पत्नी आयशा मुखर्जी यांचा ऑक्टोबर २०२३ मध्ये घटस्फोट झाला. याआधी २०११ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. तब्बल ११ वर्षांनंतर त्यांनी विवाहबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर काही काळाने शिखर धवन सोफीच्या प्रेमात पडला. मागील काही काळापासून ते रिलेशनशिपमध्ये होते.


सोफी शाइन मूळची सोफी मूळची आयर्लंडची आहे. ती प्रॉडक्ट कन्सल्टंट क्षेत्रात करिअर करत आहे. तिने लाइमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतली आहे. कॅसलरॉय कॉलेजमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. ‘नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन’मध्ये सेकंड व्हाइस प्रेसिडेंट म्हणून तिने काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच सोफीने शिखर धवनसोबतच्या त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. नंतर १२ जानेवारी रोजी शिखर आणि सोफी यांचा साखरपुडा झाला आणि आता त्यांचे लग्न झाले आहे.




Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून