भारतासह जगावर पुन्हा १० टक्के ट्रम्प टॅरिफ, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर तीन तासांच्या आतच डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वच देशांवर १० टक्के आयात कराची घोषणा केली. हा आदेश २४ फेब्रुवारी रोजी रात्री १२.०१ वाजता लागू होईल. शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर बेकायदेशीर घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने ६-३ बहुमताच्या निर्णयात म्हटले आहे की, संविधानानुसार, कर आणि आयात शुल्क लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही; केवळ काँग्रेसकडे आहे.


भारतासोबतच्या व्यापार कराराबद्दल ट्रम्प म्हणाले, ‘या करारात कोणताही बदल होणार नाही. पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत.’ व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटन, भारत आणि युरोपियन युनियनसह अमेरिकेशी व्यापार करार असलेल्या देशांना आता कलम १२२ अंतर्गत जागतिक स्तरावर १० टक्के कर आकारला जाईल, जो त्यांनी पूर्वी वाटाघाटी केलेल्या कर दराऐवजी असेल. यामुळे भारतावरील एकूण कर १८ वरून १० टक्क्यापर्यंत कमी होईल.


न्यायालयाच्या या निर्णयानंतर अवघ्या काही तासांमध्ये ट्रम्प यांच्या कार्यालयाने नव्या आदेशावर स्वाक्षरी केली असून या आदेशानुसार आता जगातील सर्व देशांमधून आयात होणाऱ्या मालावर १० टक्के आयात कराची आकारणी केली जाईल. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करून माहिती दिली.


‘मला हे सांगताना गर्व होतोय की, माझ्या ओवल ऑफिसने सर्व देशांवर १० टक्के जागतिक टॅरिफ लावण्यावर स्वाक्षरी केली असून हा निर्णय तात्काळ लागू होईल’, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याचे संकेतही दिले होते.


१९७४च्या व्यापार कायद्याच्या कलम १२२ नुसार १० टक्के जागतिक टॅरिफ लावण्याचा आदेश देऊ, जे सध्याच्या टॅरिफच्या अतिरिक्त असतील, असे ट्रम्प म्हणाले होते. तसेच मी याहुन अधिक शुल्कही लावू शकतो, असा इशाराही त्यांना दिला होता. ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयाला ‘खूप निराशाजनक’ म्हटले आहे.


‘व्यापार करार कलम १२२ अंतर्गत लावण्यात आलेला जागतिक टॅरिफ जवळपास ५ महिने लागू राहणार आहे. तसेच या काळामध्ये प्रशासन अन्य देशांवर योग्य आयात कर निश्चित करण्यासाठी आवश्यक पडताळणी करेल. यानंतर हे आयात कर वाढवलेही जाऊ शकतात. आम्ही हवे ते करू शकतो आणि संभाव्य दर याहून अधिक असू शकतात’, असे ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले.


न्यायाधीशांमध्ये योग्य काम करण्याचे धाडस नाही


ट्रम्प म्हणाले, ‘न्यायाधीश हे ‘कट्टरपंथी डाव्यांचे पाळीव’ आहेत. ते देशभक्ती दाखवत नाहीत आणि संविधानाशी एकनिष्ठ नाहीत. न्यायाधीश काही लोकांना घाबरतात, म्हणून ते योग्य निर्णय घेऊ इच्छित नाहीत. मला न्यायालयातील काही लोकांची लाज वाटते. आपल्या देशासाठी योग्य काम करण्याचे धाडस त्यांच्यात नाही’, असे म्हणत त्यांनी निर्णयाशी असहमत असलेल्या तीन न्यायाधीशांचे कौतुक केले. ज्या न्यायाधीशांनी शुल्क रद्द करण्याच्या बाजूने आपले मत नोंदवले त्यांच्यावर टीका करताना ट्रम्प म्हणाले, ‘ते अमेरिकेला पुन्हा मजबूत आणि महान बनवणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आहेत. ते आपल्या देशासाठी कलंक आहेत. ते नेहमीच 'नाही' म्हणणारे न्यायाधीश आहेत’.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे