भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. सलामीच्या 'सुपर ८' सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार असून, उपांत्य फेरीची वाट सुकर करण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा सामन्यात म्हणजे २६ फेब्रुवारी भारत विरुद्ध श्रीलंका आणि १ मार्चला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना खेळवला जाणार आहे.


भारतीय संघाने साखळी फेरीत पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत सलग ४ विजय मिळवले आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेनेही सलग ४ सामने जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असले तरी भारताची मजबूत फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी पाहता टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे.


भारतीय संघासाठी सध्या सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म. मागील तिन्ही सामन्यांत त्याला एकही धाव काढता आलेली नाही (सलग ३ डक्स). अशा स्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव त्याला पुन्हा संधी देतो की संघात बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताकडे कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग आणि अक्षर पटेल अशी स्फोटक फलंदाजांची फळी आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग यांच्या सोबतीला कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांची फिरकी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फिरकी घेऊ शकते.


अहमदाबादची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना पोषक असते, मात्र जसजसा खेळ पुढे जातो, तसतसे फिरकीपटू प्रभावी ठरतात. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना कशी रोखते यावर सामन्याच भवितव्य अवलंबून आहे.


कगिसो रबाडा, मार्को जेन्सन, लुंगी एनगिडी, केशव महाराज असे चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. फलंदाजीतही एडन मार्क्रम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, रासी व्हॅन डेर डूसन, हेन्रिच क्लासेन असे नामवंत फलंदाज आहेत ते चांगली धवसंख्या उभारु शकतात.भारताविरुद्ध मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवणे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक राहिले आहे, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून