भारत - अमेरिका व्यापार कराराशी सबंधित महत्त्वाची बैठक पुढे ढकलली

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार कराराची बोलणी आधी २३ फेब्रुवारी रोजी होणार होती. ही चर्चा आता पुढे ढकलण्यात आली आहे. चर्चेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांवर सरसकट १५ टक्के वाढीव आयात शुल्क अर्थात टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा आधीचा टॅरिफचा निर्णय बेकायदा ठरवून रद्द केला होता. ट्रम्प यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर ठेवला होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत ट्रम्प यांनी टॅरिफ संदर्भात नवा निर्णय जाहीर केला. यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार कराराची बोलणी ढकलण्यात आल्याचे समजते.


आयात शुल्क अर्थात टॅरिफ संदर्भातली ताजी स्थिती विचारात घेऊन नव्याने काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार कराराची बोलणी पुढे ढकलण्यात आली आहे.


अमेरिकेने ऑगस्ट २०२५ मध्ये भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला होता. नंतर, रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्यात आला, ज्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्क्यांवर गेला. या महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि अमेरिका यांनी हंगामी व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी एका चौकटीवर सहमती दर्शवली, ज्या अंतर्गत अमेरिका भारतावरील टॅरिफ १८ टक्क्यांवर आणेल असे ठरले. आतापर्यंत, दंडात्मक २५ टक्के टॅरिफ काढून टाकण्यात आले आहे. उर्वरित २५ टक्के टॅरिफ अस्तित्वात आहे. हे असतानाच ट्रम्प यांचा टॅरिफ बाबत नवा निर्णय आला. यामुळे भारताने टॅरिफबाबत स्पष्टतेची मागणी केली. यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार कराराची बोलणी पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आले आहे.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी