Solapur Crime: हातावर सुसाईट नोट लिहत विवाहितेने संपवलं आयुष्य; सोलापुरातील नातेपुते शहरातील हृदयद्रावक घटना

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका विवाहितेने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पायल रणदिवे असे मृत विवाहितेचे नाव असून ती अवघ्या २२ वर्षांची होती. या घटनेनंतर पोलिसांनी सासू-सासरे, दीर आणि पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.


पायल रणदिवे हिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते . यासाठी तिने क्लासही लावला होता. मात्र कुटुंबाने तो क्लास बंद केल्याचे दुःखही पायल रणदिवे हिने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहून ठेवले होते. शनिवारी सायंकाळी घरात कोणी नसताना पायल हिने आत्महत्या केली. पायलच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा असल्याने पायलच्या वडिलांनी पतीसह कुटुंबातील सासू-सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्याची तक्रार दिली आहे. पायल ही माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरी राहत होती. आता पोलिसांनी या प्रकरणात पती शशिकांत रणदिवे याच्यासह तिचे सासू-सासरे यांना अटक केली असून पायलच्या दिराचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.


पायल रणदिवे हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर मजकूर लिहला होता. यामध्ये तिने सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला, हे सविस्तरपणे लिहले होते. "हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केले .. जीव होता तो माझा.. स्वप्न होतं ग .. आजपर्यंत शांत बसले पण आता नाही .. चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले .. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते .. SORRY", असे पायलच्या सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून पायलच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे. या घटनेमुळे नातेपुते परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने