मेट्रो लाईन ४ सुरक्षित असल्याची MMRDA ने दिली माहिती
February 22, 2026 05:08 PM
मुंबई : मेट्रो लाईन ४ वरील प्रस्तावित श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ (दोन गर्डर्सच्या दरम्यान) असलेल्या भागाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्प पथकाने बारकाईने तपासणी केली आहे.
सदर प्रस्तुत दृश्यांमध्ये दिसणारी रेषा ही अतिरिक्त काँक्रीट स्लरी (बांधकामादरम्यान वापरले जाणारे सिमेंट, पाणी आणि अॅडिटिव्ह्जचे मिश्रण) आहे. अशी अतिरिक्त स्लरी कधी कधी पृष्ठभागावर दिसू शकते. तपासणीदरम्यान पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत किंवा बीमला तडे गेले आहेत असे कोठेही आढळून आले नाही. दरम्यान, ही अतिरिक्त स्लरी काल रात्री काढून टाकण्यात आली आहे. सदर ठिकाणावरील बीम पूर्णपणे सुरक्षित, मजबूत आणि स्थिर आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.